दिवाळीच्या तोंडावर टोमॅटो उत्पादक हतबल
निमगाव केतकी, ता.१६ : सप्टेंबर महिन्यामध्ये सततच्या पावसामुळे निमगाव केतकी (ता.इंदापूर) परिसरातील टोमॅटोचे सडून जळालेले फड शेतात उभे आहेत. या पिकातून यंदा प्रथमच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक फटका बसल्याने तो ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हतबल झाला आहे.
तरकारी पिकामध्ये भरवशाचे पीक म्हणून निमगाव केतकी परिसरातील शेतकरी टोमॅटोची लागवड करतात.यंदाही जून जुलै मध्ये पाचशे एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर टोमॅटोची लागवड झाली होती. मात्र टोमॅटोचे उत्पादन सुरू होतानाच सप्टेंबरमध्ये सतत पाऊस लागून राहिल्याने फडामध्ये पाणी साचून राहिले. फड वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणीवर मोठा खर्च केला मात्र तो पाण्यातच गेला. फड संपेपर्यंत चार ते तोडे होतात परंतु यंदा एक-दोन तोड्यातच फड जळून गेल्याने सर्वच शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले.
निमगाव केतकी येथील टोमॅटो उत्पादक राजू भोंग म्हणाले, माझ्या दीड एकर फडासाठी पावणेदोन लाखापेक्षा अधिक खर्च झाला.एकरी साधारणपणे ४०० ते ५०० क्रेट (एक क्रेट ३० किलो) माल निघतो.एका क्रेटला ८०० ते ९०० रुपये बाजारभाव मिळाला तरच चार पैसे शिल्लक राहतात. मात्र सप्टेंबर मधील सततच्या पावसामुळे फक्त दोन तोडे निघाले. प्रतिकूल हवामानमुळे यातील ऐंशी टक्के माल लाल ऐवजी तिरंगा निघाला व हा माल फक्त ७० रुपये क्रेट दराने व्यापाऱ्याने घेतला.या पिकामध्ये यापूर्वी एवढा मोठा आर्थिक फटका कधी बसला नव्हता.त्यामुळे शासनाने मोठ्या स्वरूपात टोमॅटो उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी.
दीड एकर टोमॅटोचा फड होता.सततच्या पावसामुळे पहिला तोडा झाल्यानंतर तो सडून गेला.रोपे, मशागत, स्टेजिंग, सुतळी, मल्चिंग पेपर, औषधे, खते व वाढलेली मजुरी याचा सुमारे दोन लाख रुपये खर्च झाला.उत्पन्न दहा हजार सुद्धा निघाले नाही.एवढा मोठा फटका यंदा प्रथमच बसला आहे.
- भीमराव बोराटे, टोमॅटो उत्पादक, निमगाव केतकी
02978
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.