निमगाव केतकी येथे 
माळी समाजाची बैठक

निमगाव केतकी येथे माळी समाजाची बैठक

Published on

निमगाव केतकी, ता. १ : नायगाव (ता. पुरंदर) येथे शनिवारी (ता. ३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवशी होणाऱ्या त्यांच्या स्मारक भूमिपूजनानिमित्त बुधवारी (ता. ३१) निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील श्री संत सावतामाळी मंदिराच्या प्रांगणात इंदापूर तालुका माळी समाजाच्या वतीने बैठकीच्या आयोजन केले होते. या बैठकीत इंदापुरातून १००पेक्षा अधिक खासगी चारचाकी गाड्या व काही बसेस जाण्याचे नियोजन केले आहे. यावेळी ॲड. कृष्णाजी यादव, माऊली बनकर, देवराज जाधव, मच्छिंद्र चांदणे, दत्तात्रेय शेंडे, संतोष राजगुरू, राजू जठार, संदीप आदलिंग, राहुल जाधव, गणेश राऊत यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, मंत्री अतुल सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत १४३ कोटींच्या विकास आराखड्याचे भुमिपूजन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com