वरकुटे खुर्द येथे रंगला कुस्त्यांचा थरार

वरकुटे खुर्द येथे रंगला कुस्त्यांचा थरार

Published on

निमगाव केतकी, ता. ५ : वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथील पिरसाहेब यात्रेची सांगता शनिवारी (ता. ३) लाल मातीत झालेल्या २००हून अधिक नेत्रदीपक कुस्त्यांनी झाली. कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.
यात्रेची सुरुवात गुरुवारी (ता. १) संदलच्या कार्यक्रमाने झाली. दुसऱ्या दिवशी पिरसाहेब यांच्या घोड्याची मिरवणूक (छबिना), शोभेचे दारू काम व मनोरंजनासाठी कोल्हापूर येथील वैभव आर्केस्ट्रा हे कार्यक्रम यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. शनिवारी (ता. ३) निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात प्रथम क्रमांकाच्या एक लाख ५१ हजार रुपये इनामाच्या कुस्तीत सत्पाल सोनटक्के व समीर शेख यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत सत्पाल सोनटक्के याला विजयी घोषित करण्यात आले. याप्रसंगी कै. नवनाथ (दादा) ठवरे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमनाथ ठवरे पाटील यांच्यावतीने सोनटक्के यास गदा भेट देण्यात आली.
आखाड्यामध्ये कालीचरण सोलनकर विरुद्ध विक्रम घोरपडे व सुनील खताळ विरुद्ध जमीर मुलाणी या कुस्त्या बरोबरीत सुटल्या. वरकुटे गावातील पहिलवान तेजस शिंदे व स्वप्नील दगडे यांनी नेत्रदीपक कुस्त्या करीत विजय संपादन केला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर बक्षीसांचा वर्षाव केला. आखाड्यामध्ये पहिलवान पोपट शिंदे, राजकुमार शिंदे, राजाराम शेंडे, बबन शेंडे, जनार्दन यादव, उत्तम शेंडे, बबलू पठाण, शंकर शिंदे, गोविंद शेंडे, लक्ष्मण शेंडे आदींनी पंच म्हणून काम पाहिले.
यात्रा यशस्वी होण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष महादेव मिसाळ, ॲड. कृष्णाजी यादव, सरपंच बापूराव शेंडे, ॲड. शशिकांत शेंडे, शिवाजी यादव, नितीन शेंडे, रतन हेगडे, अस्लम मुलाणी, राज पाटील, संतोष मोरे, दत्तात्रेय मासाळ, ॲड. संदीप शेंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
किरण म्हेत्रे, प्रवीण ठवरे व प्रा. शहानुर मुलाणी यांनी उत्कृष्टपणे कुस्त्यांचे निवेदन केले.

03133

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com