निमगाव केतकीत मतदार जागृती अभियान
निमगाव केतकी, ता. २१ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक वडापुरेवस्ती येथील विद्यार्थ्यांनी मतदार जागृती अभियान राबविले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने मतदार जागृती अभियान राबविण्यासाठी शुक्रवारी (ता. १६) काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे वडापुरेवस्तीवरील अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या ४५ विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. २०) मतदान करा, असे फलक घेऊन परिसरात फेरी काढत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी शाळेतील मुलांसाठी आनंदी बाजार, खाऊगल्ली उपक्रम घेतला. यामध्ये २० हजारांची उलाढाल झाली. तसेच, महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगुळाच्या कार्यक्रमाला १००पेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमासाठी तात्यासाहेब वडापुरे, अण्णा पाटील, सोमनाथ म्हेत्रे, सोनाली डोंगरे, सुगंधा भोंग, वर्षा भोंग, बकुळा शेंडे, विषयतज्ज्ञ संभाजी खंडागळे, विश्वजित करे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक किरण म्हेत्रे, शिक्षिका वंदना मिसाळ, अंगणवाडी सेविका छाया भोंग, मदतनीस मोनाली जाधव यांनी केले.
03167
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

