शेळगावच्या जगताप यांचा राज्यस्तरीय गौरव
निमगाव केतकी, ता.१० : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे दिला जाणारा ''यशवंत पंचायत राज अभियान'' अंतर्गत राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार शेळगाव (ता. इंदापूर) येथील चंद्रकांत जगताप यांना प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुणे येथे हा गौरव करण्यात आला.
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात शनिवारी (ता. ७) हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, आमदार शंकर मांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालिका शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, उपमुख्य कार्यकारी पंचायत विभाग भूषण जोशी, इंदापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन खुडे, माजी पंचायत समिती सदस्य ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, सरपंच उर्मिला शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. नीलेश शिंगाडे, सागर वाघमोडे उपस्थित होते.
3210
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

