कचरवाडीतील शिबिरात १४८ जणांकडून रक्तदान

कचरवाडीतील शिबिरात
१४८ जणांकडून रक्तदान
Published on

निमगाव केतकी, ता. १३ : कचरवाडी (ता. इंदापूर) येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन महात्मा फुले जयंती उत्सव समितीने केले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. इंदापूर येथील मुक्ताई रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करत रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती तुषार जाधव, पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग, तात्यासाहेब वडापुरे, ग्रामपंचायत अधिकारी भारत मारकड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनाजी कचरे व सुनील बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष गदादे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com