निमगाव केतकीत प्रशासनाचे दुर्लक्ष

निमगाव केतकीत प्रशासनाचे दुर्लक्ष
Published on

मनोहर चांदणे : सकाळ वृत्तसेवा
निमगाव केतकी, ता. १४ : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत निमगाव केतकी (ता. इंदापूर) हद्दीत रस्त्यालगत झाडाझुडूपाने वेढलेल्या उघड्या विहिरींमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, निमगाव केतकी- काटी या रस्त्यावर वरकुटे खुर्द हद्दीत एक व काटी हद्दीत असलेल्या या विहिरी धोकादायक बनल्या आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
याबाबत पालखी महामार्गाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

विहिरींची एकूण संख्या
निमगाव केतकी- काटी रस्त्यालगत - २
पालखी महामार्गालगत निमगाव केतकीत - १

उपाययोजनांचा अभाव
विहिरीभोवती वाढलेली झाडेझुडपे
चेतावणी फलक, परावर्तक व्यवस्था नाही
कठडे, झाकन, लोखंडी जाळी नाही

आमची वडिलोपार्जित विहीर आहे. तीन वर्षांपूर्वी या ठिकाणचा रस्त्याचे डांबरीकरण झाले असता त्यावेळी संबंधित ठेकेदाराने विहिरींच्या रस्त्याच्या बाजूला तीन पातळ लोखंडी पट्ट्या लावल्या त्या मजबूत नाहीत. त्यावेळेस आम्ही कठडे बांधून द्या, असे सांगितले होते. या ठिकाणी शासनाने विहिरीला मजबूत कठडे बांधून द्यावेत.
- संतोष मोहन मोहिते, विहिरीचे मालक

03258

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com