महागाईबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ
महागाईबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ

महागाईबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. १ : "लोकांचे पगार वाढत नाहीत, पण गॅसची किमत मात्र वाढते आहे. सध्या महागाई वाढत चालली असून, त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे," असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

शिंदेवाडी (ता.भोर) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिंदेवाडी येथील नियोजित ग्रामसचिवालयाचे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-सातारा रस्त्यालगत अपूर्ण ठेवलेली ड्रेनेजची कामे, गोगलवाडी फाट्यावरील अपूर्ण रस्त्याचे काम, शिंदेवाडी येथील शेतात एका व्यावसायिकाने सोडलेले सांडपाणी आदीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सुळे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच हे प्रश्न सोडविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विक्रम खुटवड, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे, माजी जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, माजी पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे, गणेश खुटवड, शिंदेवाडीचे सरपंच अभिजित शिंदे, उपसरपंच रेखा गोसावी, रोहिणी गोगावले, अरविंद शिंदे, प्रवीण शिंदे, वैशाली चौधरी, चंदना शिंदे, लक्ष्मण कृष्णा शिंदें आदी यावेळी उपस्थित होते.

01006