

खेड शिवापूर, ता. २५ : नोंदवहीतील शिल्लक खतसाठा आणि प्रत्यक्षात असलेला खतसाठा यामध्ये तफावत आढळल्याने वेळू (ता. भोर) येथील श्री भैरवनाथ शेती भंडार या केंद्राचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. कृषी विभागाने ही कारवाई केली आहे.
कृषी अधिकारी गुण नियंत्रण निरीक्षक आणि भोर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या केंद्राची तपासणी केली होती. यावेळी साठा रजिस्टरमधील नोंदी आणि प्रत्यक्ष खतसाठा जुळत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच रासायनिक खतसाठ्याचा फलक ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी न लावल्याची त्रुटीही तपासणीत आढळली. तपासणी अहवालाच्या आधारे खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने खत विक्री परवाना सुमारे एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. भविष्यात अशा प्रकारचे उल्लंघन होऊ नये, अशी सक्त ताकीदही संबंधित विक्रेत्यास देण्यात आली आहे. कृषी अधिकारी गुण नियंत्रण सुरज पाटील, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रेय गौसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुनीलकुमार जाधव आणि तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.