चौथ्यांदा जिंकल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

चौथ्यांदा जिंकल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

कोळवण, ता. ४ : बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्या. त्याचा कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह होता. यावेळी कोळवण खोऱ्यातील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांकडून प्रथम छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला. सुळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच परिसरातील महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते कोळवण बाजारपेठेमधील चौकात एकत्र जमले होते.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख सचिन खैरे, भरत सातपुते, चेतन फाले, साईदास शिंदे, प्रदीप कालेकर, दत्ता कालेकर, लहू लायगुडे, हरी दुर्गे, धर्मा फाले, मारुती फाले, सीताराम धिडे, दत्तात्रेय टेमघरे, लक्ष्मण जाधव, पंकज धिडे, नारायण धिडे, भाऊ फाले, नितीन लोयरे, संजय साठे, नरसिंह फाले, सुनील फाले, प्रकाश वाळंज, संतोष शेलार, वसंत फाले, विष्णू घायतडकर
उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com