संगीत परीक्षेत मृदंग ताल साधनाच्या विद्यार्थ्यांचे यश

संगीत परीक्षेत मृदंग ताल साधनाच्या विद्यार्थ्यांचे यश

Published on

कोळवण, ता. ४ : काशिग (ता. मुळशी) येथील मृदंग ताल साधना गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या पखवाज ‘संगीत विशारद’ या परीक्षेत उत्तम यश संपादन केले असून गुरुकुलच्या पन्नास विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यामध्ये पन्नास विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले.

व गुरुकुलचा या परीक्षेतील निकाल शंभर टक्के लागला असून या यशाबद्दल गुरुकुल मधील विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक ह.भ.प शुभम महाराज शिंदे यांचे परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या पालकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

काशिग येथील मृदंग ताल साधना गुरुकुलमध्ये मागील सात ते आठ वर्षांपासून मुळशी, मावळ व पुण्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पखवाज तसेच वारकरी संप्रदाय परंपरेचे शिक्षण दिले जाते. त्यामध्ये आध्यात्मिक शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी गावोगाव जाऊन कीर्तन, भजन, हरिपाठ व पखवाज वादन करून आपली सेवा देतात. गावोगाव विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक व सांप्रदायिक शिक्षणाची व पखवाज वादनाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा प्रयोग करत असल्याची भावना गुरुकुलचे संस्थापक व शिक्षक शुभम महाराज यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.