विविध योजना नोंदणीचे 
चिखलगाव येथे शिबिर

विविध योजना नोंदणीचे चिखलगाव येथे शिबिर

Published on

कोळवण, ता. २७ : ‘‘महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचाराचे आहे. राज्य सरकार जाणीवपूर्वक महिलांना विविध क्षेत्रातील प्रगती व्हावी म्हणून प्राधान्य देत आहे. महिला सक्षमीकरणासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. लाडकी बहीण योजना आणली. प्रशासनात प्रमुख जबाबदाऱ्या महिलांना दिल्या. आपली पुणे जिल्हा बॅंक देखील महिलांसाठी अनेक योजना राबवून स्री सक्षमीकरणाचे काम करीत आहे,’’ असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले.
चिखलगाव (ता. मुळशी) येथे श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व युनिक पथ कृषी पर्यटन केंद्राच्या सहकार्याने विविध योजना नोंदणीचे मोफत तीन दिवसीय शिबिर आयोजित केले होते. त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी चांदेरे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य
भगवा नाकती, उपसरपंच किरण फाले आदी उपस्थित होते. दत्तात्रेय शेळके यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com