मुळशी तालुक्यात रस्त्यांची अवस्था बिकट

मुळशी तालुक्यात रस्त्यांची अवस्था बिकट
Published on

कोळवण, ता. ३० ः मुळशी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनची कामे विविध गावांमध्ये झाली आहेत. हे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. तालुक्यांतील काशिग स्टँड ते शेळेकेवाडी रोड, बोंद्रेवाडी ते तिडकेवाडी रस्ता, अमराळेवाडी रस्ता तसेच पिरंगुट घाट ते बोतरवाडी, नांदगावमधील खराडेआळी रस्ता, भालगुडीतील मुख्य रस्ते व इतर रस्त्यांची अवस्था खूपच भयानक आहे.

प्रत्येक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ते खड्डेमय झाले आहेत. लवकरात लवकर यांची दुरुस्ती करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन संबंधित मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे पुणे स्थित कार्यालयातील अधिकारी सहायक अभियंता अभिजित मुंडे यांना दिले होते. तसेच पिरंगुट घाट ते बोतरवाडी-उरवडे या मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत, यामार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. तसेच या रोडवर बरेच ठिकाणी शाळा आहेत. त्यामुळे गतिरोधक महत्त्वाचे आहेत, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक अमित कुडले, भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदयस नामदेव टेमघरे, केलास मारणे, बंडू साळुंखे, समीर शिंदे, प्रदीप बोंद्रे, वैभव पवळे मोहन आवळे, सागर गुजर, चंद्रकांत शिंदे, रामदास कुंभार, दत्ता काळभोर, अरुण वीर, राहुल वीर, सूरज साळुंखे यांच्यावतीने केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले गेले, व गतिरोधक बसविले होते. परंतू, दोनच महिन्यांत पुन्हा खड्डे पडले व गतिरोधक तुटलेल्या अवस्थेत आहेत.


सध्या पावसाळ्यात डांबरीकरण करून खड्डे बुजविता येत नाहीत. नागरिकांच्या सोयीसाठी खड्ड्यांत खडी टाकून बुजविण्यात येतात. पावसाळ्यानंतर पक्क्या स्वरूपात खड्डे बुजवून
ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यांबाबत तक्रारी आहेत. तेथे प्रत्यक्षात आम्ही पाहणी करून आढावा घेवू.
- अभिजित मुंडे, शाखा अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पुणे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत नांदगाव खराडेवाडीतील रस्त्यावर खड्डे पडून खूप दिवस झालेत. संबंधित विभागातील अधिकारी काम करू अशीच उत्तरे देतात. परंतु, खड्डे हे फक्त खडी टाकून भरलेत. पक्क्या स्वरूपात खड्डे डांबरीकरण टाकून भरलेच नाहीत, ठेकेदाराकडे देखभाल दुरुस्ती आहे, त्याने हे काम करायला हवे.
- राजू फाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com