कोळवणमधील बांधकामात हलगर्जीपणा

कोळवणमधील बांधकामात हलगर्जीपणा
Published on

कोळवण, ता. ३० ः कोळवण खोऱ्यातील गावांना हवामानाची माहिती योग्य व शास्त्रशुद्ध पद्धतीने उपलब्ध व्हावी म्हणून भारतीय हवामानशास्त्र विभाग (स्कायमेट) संपूर्ण देशभर स्वयंचलित हवामान केंद्र महसूल व कृषी मंडलनिहाय उभारत आहेत. याचाच एक भाग म्हणून कोळवणमध्ये स्कायमेटकडून नेमलेल्या एजन्सीकडून शनिवार (ता. २८) कोळवण-पौड मुख्य रस्त्यालगत काम सुरू केले. या कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

स्कायमेटकडून जारी केलेल्या अधिकृत बांधकाम आराखड्याच्या ड्रॉईंगनुसार व घालून दिलेल्या मानकांनुसार हे काम होणे अपेक्षित आहे. संबंधित काम करणाऱ्या एजन्सीकडून हे काम उगाचच करायचे म्हणून केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे काम करताना सात मीटर लांब व पाच मीटर रुंदीच्या जमिनीच्या सपाट पृष्ठभागावर करायचे असताना प्रत्यक्षात हे काम करताना जमिनीचे कोणत्याच प्रकारे सपाटीकरण केले नाही. ओबडधोबड जमिनीवर कंपाउंड वॉलसाठी सिमेंट खडीचे मिश्रण करून ब्लॉक तयार करून त्यावर लोखंडी ॲंगल रोवले गेलेत.

स्वयंचलित हवामान केंद्राची उपकरणे ठेवण्याच्या जागेवर सपाटीकरण केले नाही. तसेच कपांऊंड वॉलच्या लोखंडी ॲन्गलला जी तार लावली जाते. ती हाताने गुंडाळण्यात आली. हवामान केंद्रात प्रवेशासाठीच्या गेटचा दरवाजा आताच नीट लागत नाही. लोखंडी ॲन्गल लेवलमध्ये लावले नसून ते हाताने सहज हलतात व सिमेंटचे ब्लॉक आताच तुटले आहेत.

ओल्या बांधकामावर रंग दिल्याचेही आढळले आहे. स्वयंचलित हवामान केंद्र हे कायम स्वरूपी राहणार असून त्याचे काम जर निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने होणार असेल तर, हे स्वयंचलित हवामान केंद्र पुढे कसे काम करणार, हा एक मोठा प्रश्न आहे. याबाबत कोळवणमधील सजग नागरिक समीर दुडे व स्वराज्य पक्ष पुणे जिल्हा निमंत्रक राजू फाले यांनी संबंधित काम करणाऱ्या एजन्सीच्या माणसांस हे काम थांबवायला लावले आहे. याबाबत एजन्सीकडून खुलासा मागविला तर त्यांनी सांगितले की, जर ठेकेदार ठरलेल्या मानाकांनूसार काम करत नसेल तर, हे काम आम्ही पुन्हा करून घेवू. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनाही माहिती दिली. त्यांनीही याची गांभीर्यपूर्वक दखल घेतली आहे.


स्वयंचलित हवामान केंद्राचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे केले आहे. हात लावला तरी लोखंडी ॲन्गल हलतात. तारा लूज बसविल्या आहेत. सिमेंट ब्लॉक आताच तुटले आहेत, असे निकृष्ट दर्जाचे काम योग्य मानांकांनुसार गुणवत्तापूर्ण दर्जाचे व्हावे.
- समीर दुडे, कोळवण


स्वयंचलित हवामान केंद्र स्कायमेट या शासकीय संस्थेमार्फत उभारली जात आहेत. त्यांचे काम योग्य प्रकारे
व्हावे, मी कोळवणमधील या कामासंदर्भात स्कायमेटकडे कळविले आहे. हे काम योग्य पद्धतीने व्हावे, म्हणून मी स्वतः सूचना केल्या आहेत.
-संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक पुणे

Assoiated Media Ids : KLO24A01357,
KLO24A01358, KLO24A01356

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com