

कोळवण, ता. ३० : मुळशी तालुक्यातील कोळवण विभागात पीएमपीच्या बसेस कोळवण पर्यंत येत आहेत त्या सर्व बसेसच्या सेवांचा विस्तार काशिग पर्यंत वाढविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने तालुका प्रमुख सचिन खैरे, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले, तालुका समन्वयक नामदेव टेमघरे, उपतालुका प्रमुख अनंता वाशिवले, उपतालुका प्रमुख पांडुरंग निवेकर, नितीन लोयरे, संतोष लोयरे आदींनी पीएमपीच्या वाहतूक विभागास निवेदन देवून मागणी केली आहे. कोळवण ते काशिग हे अंतर फार कमी आहे तसेच आता रस्ता देखील चांगला आहे. विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायीक, शेतकरी, महिला वर्ग यांच्याकरिता या मार्गाचा विस्तार होणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे लवकरात लवकर पीएमपीचा विस्तार काशिगपर्यंत करावा, अशी मागणी केली आहे. यावर पीएमपी वाहतूक विभागाकडून हा प्रस्ताव मासिक सभेत वरिष्ठांपुढे विचार करण्यासाठी ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.