चिखलगावात आज शिवजयंती मिरवणूक

चिखलगावात आज
शिवजयंती मिरवणूक
Published on

कोळवण, ता. १८ : चिखलगाव (ता. मुळशी) येथे बुधवारी (ता.१९) धर्मवीर प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून, दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता किल्ले लोहगडावरून चिखलगाव येथे शिवज्योतीचे आगमन आणणार आहे. सायंकाळी ४ वाजता चिखलगावपासून पौडपर्यंत दुचाकी मिरवणूक होईल. सायंकाळी ४.३० वाजता पौड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची टाळ- मृदंगाच्या घोषात भव्य पालखी मिरवणूक होईल. पालखीसाठी मृदुंग ताल साधना वारकरी गुरुकुल, काशिगमधील विद्यार्थी साथ करणार आहेत. त्यानंतर खास महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान लाडक्या महिलांचा हा कार्यक्रम होईल. त्यानंतर
हरिपाठ होईल. सायंकाळी ७ वाजता पांडुरंग महाराज शितोळे यांचे कीर्तन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com