महाशिवरात्रीनिमित्त 
भालगुडी येथे कार्यक्रम

महाशिवरात्रीनिमित्त भालगुडी येथे कार्यक्रम

Published on

कोळवण, ता. २५ ः कोळवण खोऱ्यातील भालगुडी येथील जागृत प्रसिद्ध व स्वयंभू श्रीनारायणदेव देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (ता. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी ‘श्रीं’स ब्रह्मवृंदांकडून वेद मंत्रांच्या घोषात अभिषेक, ‘श्रीं’चे पंचोपचार स्नान, वस्त्र अलंकार, पादुका पूजा, यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले, दुपारी विविध गुणीजन कलाकारांकडून भजनाची सेवा,
सायंकाळी मारुती महाराज साठे यांचे प्रवचन, हरिपाठ, सायंकाळी सात ते नऊ या वेळेत विजय महाराज जगताप यांचे कीर्तन, रात्री दहा ते अकरा श्री भैरवनाथ पालखी मिरवणूक, अकरानंतर श्रीराम कलापथक पवळेवाडी यांचा भारुडचा कार्यक्रम सादर होणार आहे. कोळवण ते भालगुडी हे अंतर पाच किलोमीटरचे असून पायी चालणाऱ्या भाविकांसाठी उद्योजक नितीन साठे व सचिन साठे यांच्याकडून मोफत गाडी प्रवासाची सोय, तसेच आमदार शंकर मांडेकर यांच्याकडून ‘श्रीं’चे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत खिचडी (फराळ) वाटप, दुपारी बारा वाजता आमदार मांडेकर यांचा भालगुडी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती भालगुडी ग्रामपंचायत सरपंच संतोष शंकर साठे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com