वळकी नदीतील दगड, गोटे, गाळ काढा

वळकी नदीतील दगड, गोटे, गाळ काढा
Published on

कोळवण, ता. २८ ः कोळवण (ता. मुळशी) खोऱ्याची शेती व पिण्याच्या पाण्यासाठी जीवनदायिनी म्हणून ओळख असलेल्या वळकी नदीतील दगड, गोटे, गाळ काढण्याची मागणी नागरिक करत आहेत.

कोळवण ते चालेमधील बागायती शेती ही वळकी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामध्ये हाडशी, वाळेण व काशिग डॅममधून शेतीसाठी पाणी साधारण डिसेंबर ते जूनपर्यंत सोडले जाते. याच पाण्यावर परिसरात ऊस व इतर बागायती पिके घेतली जातात. सततचा पाऊस व पावसासोबत वाहून येणारा राडारोडा दगड, गोटे, गाळ व गाळ मिश्रित वाळू नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचले आहे.
यामुळे वळकी नदीपात्र उथळ झाले आहे. वळकी नदीपात्राची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. नदीचे पात्र अरुंद आहे, तेथे व नदीचे पात्र विस्तीर्ण आहे, तेथे हा गाळ राडारोडा येऊन थांबला आहे. आता उन्हाळा सुरू आहे. पाण्याचे आवर्तन आता थांबले आहे व नदीपात्र कोरडे ठाक पडले आहे. यामुळे हीच वेळ साधून नदीपात्रातील गाळ व राडारोडा काढला पाहिजे, हा गाळ निघाल्यास नदीपात्राचा डोह खोल होईल. त्यामुळे शेतीसाठी पाणी जास्त दिवस वापरता येईल. तसेच नदीत असणारे झरे सुद्धा पुनर्जिवीत होतील. वाळेण व काशिग डॅममध्ये सुद्धा गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. आता पुढील एप्रिल व मे महिन्यात या डॅममधील गाळ काढला, तर या डॅममधील पाणी साठा वाढेल. तसेच हा गाळ शेतीसाठी उपयुक्त असतो, हा सुपीक गाळ शेतात टाकल्यास शेतीची सुपीकता वाढून उत्पादन वाढते. त्यामुळे शासनाने वळकी नदी व हाडशी-काशिग-वाळेण डॅममधील गाळ काढण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

वळकी नदीतील गाळ काढल्यास शेतीसाठी पाणी जास्त दिवस वापरता येईल. हाडशी, काशिग व वाळेण डॅममधील गाळ काढल्यास या डॅममधील पाणीसाठा देखील वाढेल. या कामासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. नाम फाउंडेशन अथवा ‘सकाळ रिलिफ फंड’ यांच्याकडे याबाबत बोलणी करणार आहे.
- ज्ञानेश्वर डफळ, अध्यक्ष, शिवसहकार सेना, मुळशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com