भाताची पुनर्लागवड कशी करायची?
कोळवण, ता.२२ : मुळशी, मावळ, भोर राजगड हे तालुके भाताचे आगार म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु याच भाताच्या आगारात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खिंडार पडले आहे. पावसामुळे मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात पेरणी केलेल्या रोपवाटिका या पाण्याखाली बुडून गेल्या आहेत. नुकतेच उगवण होत असलेले भात मुळासकट पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाच्या सोबत वाहून गेले आहे. त्यातून शिल्लक राहिलेली भात रोपे पाण्याखाली बुडाली आहेत. यामुळे भाताची पुनर्लागवड कशी करायची? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मुळशीतील कोळवण परिसरात पाण्याखाली भात रोपे बुडाल्यामुळे पाणी साचल्याने कुजण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत बहुतांश भात रोपवाटीकाच नष्ट होणार असल्याने एवढ्यात पावसाने उघडीप दिली नाही तर यावर्षी भात लागवडच करता येणार नाही. भात लागवड करता आली नाही तर बारा महिने खायचे काय? कोरडवाहू जमीन धारक शेतकऱ्यांचे भात उत्पादन घेऊनच त्याद्वारे वर्षभराचे आर्थिक गणित चालते आता तेच कोलमडणार आहे.
शासनाने आता या परिस्थितीचा विचार व पाहणी करून विशेष बाब म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुळशी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी शासनाकडे केली आहे.
शासनाचे आकडेवारी नुसार जून महिन्यात सरासरी पाऊस २७८ मिलिमीटर असतो. जून महिन्यातील १ ते गुरुवार ता. १९ पर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत पडलेला पाऊस २३३.६ मिलिमीटर इतका आहे. म्हणजे सरासरीच्या ८३ टक्के इतका पाऊस आताच झाला असून अजूनही जून महिन्यातील अकरा दिवस बाकी आहेत. तोपर्यंत किती पाऊस पडेल माहिती नाही.
जून महिन्यातील सात ते दहा तारखेच्या दरम्यान भात पेरणी केली पावसाने भात उगवण झाली परंतु काल रात्री पासून पडणाऱ्या जोरदार मुसळधार पावसामुळे भात रोपांचे रोपटे पाण्याखाली गेल्याने भाताची पुनर्लागवड करता येणार नाही शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा.
- ज्ञानोबा मांडेकर, शेतकरी, डोंगरगाव, ता.मुळशी
02173
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.