मुळशी तालुक्यात वृक्षारोपण मोहीम
कोळवण, ता.६ : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुळशी तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ , ‘एक पेड माँ के नाम’ आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाचा चौथा वर्धापन दिनानिमित्त सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. याद्वारे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
कोळवण येथील विकास संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुणे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतरखांबोली, दारवली, पिरंगुट, कासार आंबोली, कासारसाई, संभवे, मुळशी खुर्द, सारोळे, माण, पुनावळे, कोंढावळे, खारावडे, घोटावडे, चांदिवली, रावडे, रिहे येथील तसेच अन्य संस्थांनी वृक्षारोपण मोहीम यशस्वी राबविली.
दरम्यान, पौड येथील जिल्हा बॅंकेच्या सभागृहात जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुनील धायगुडे, सुरेश नागरे, राजेंद्र मारणे, दिनेश शेळके, विजय तिकोणे, सहादू साठे, दिनेश दाभाडे, दत्ता जोरी, तुषार धिडे, विजयसिंह धुमाळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.