कोळणमध्ये संविधानमय शालेय पॅडचे वाटप
कोळवण : कोळवण केंद्रातील १४ जिल्हा परिषद शाळांतील २८५ विद्यार्थ्यांना संविधानमय शालेय पॅडचे वाटप होतले शाळेचे शिक्षक विजय वडवेराव यांच्या वतीने करून संविधान दिवस साजरा करण्यात आला. कोळवण ग्रामपंचायतीच्या सरपंच धनश्री पालकर व होतले शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कोमल दुर्गे यांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानास अभिवादन केले. सामूहिक स्वरूपात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यंदाचे वर्ष हे संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने शासनाच्या घर घर संविधान या उपक्रमाचा सांगता सांगता समारंभ करण्यासाठी आज संविधान दिनाच्या दिवशी संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये यांचे फलक हातात घेऊन संविधान आणि संविधान शिल्पकार यांच्या विजयाच्या घोषणा देत विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी गावातून संविधान प्रभात फेरी काढत संविधान जागृती व प्रचार प्रसाराचे कार्य केले. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या मूलभूत हक्क व कर्तव्ये पाठांतर व सादरीकरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. विजयी स्पर्धकांना रोखरक्कम, सन्मानचिन्ह, शालेय साहित्य भेट देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी, सर्व उपस्थित शिक्षक,पालक व ग्रामस्थ यांना अल्पोपाहार देण्यात आला. या वेळी कुंडलिक दुर्गे, हरिभाऊ खंडागळे, संदीप दुर्गे, बालाजी जाधव, भाग्यश्री गायकवाड, अनिता थोरात आदींसह शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
2704
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

