‘महाविस्तार अॅप शेतकऱ्यांसाठी वरदान’
कोळवण, ता.२७ : कृषी विभागाने विकसित केलेले अत्याधुनिक मोबाईल अॅप ‘महाविस्तार एआय’ मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, असे मुळशी तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी सांगितले.
हवामानाचा अचूक न अंदाज मिळाल्यामुळे पेरणी, फवारणी आणि काढणीच्या नियोजनात या अगोदर अडचणी निर्माण होत होत्या परंतु ही अनिश्चितता आता या अॅपमुळे मोठ्या प्रमाणात कमी झाली होण्यासाठी मदत होणार आहे. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, पावसाचा अंदाज आणि पुढील काही दिवसांचे वातावरण याची माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होते. यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अॅप अत्यंत उपयुक्त आहे. हवामान अंदाज, रोगनिदान, बाजारभाव, सरकारी योजनांची माहिती हे सर्व सेवा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरमधून अॅप डाऊनलोड करून घ्यावा, असे आवाहन खाडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

