डोंगरदऱ्यांतून घुमणारी पर्यटनाची नवी चाहूल

डोंगरदऱ्यांतून घुमणारी पर्यटनाची नवी चाहूल

Published on

पांडुरंग साठे, कोळवण (ता. मुळशी)

मुळशी तालुक्यातून काशिग-हाडशी-कोळवण-चाले-दारवली या मार्गावरून १९ ते २३ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘पुणे ग्रॅंड टूर चॅलेंज’ सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
या स्पर्धेचे निमित्ताने या भागातील रस्त्यांनी कात टाकली आहे. रस्ते नेहमी पेक्षा रुंद होऊन रस्त्यांचे रुपडे पालटले आहे. या अगोदरच कोळवण खोऱ्यात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन होत असल्याने येथे असलेल्या पर्यटन वाढीसाठी नक्कीच मोठा हातभार लागणार असल्याने मुळशी तालुक्यातील पर्यटनक्षेत्रास मोठी चालना मिळणार आहे.

इतिहास, अध्यात्म, निसर्गाचा संगम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा सांगणारे गडकिल्ले, संत ज्ञानेश्वर (ज्ञानोबा) महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, तसेच सह्याद्रीच्या डोंगररांगा, जंगलं, धरणं व धबधबे यामुळे मुळशी तालुका जागतिक पर्यटनासाठी आकर्षण केंद्र ठरत आहे.कोळवण खोऱ्यातील गडकोट, काशिग हाडशी तलाव सत्य साई पांडुरंग क्षेत्र हाडशी, चिन्मय मिशन या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगांमध्ये वसलेला, निसर्गसंपन्न आणि आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाने समृद्ध असा मुळशी तालुका आता ‘ग्रँड चॅलेंज टूर’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या उपक्रमामुळे पर्यटनासोबतच स्थानिक दरडोई उत्पन्नात वाढ, रोजगारनिर्मिती आणि सर्वांगीण आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

प्रदूषणमुक्त व संस्कृती जपणारा तालुका
स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, प्रदूषणविरहित परिसर, जैवविविधतेने समृद्ध निसर्ग आणि संस्कृतीचे जतन करणारे मानवी जीवन ही मुळशीची खरी ओळख आहे. त्यामुळे इको-टुरिझम, ग्रामीण पर्यटन व आध्यात्मिक पर्यटनासाठी हा तालुका आदर्श ठरत आहे.

यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
हॉटेल, होमस्टे, रेस्टॉरंट्स
वाहतूक, टूर गाइड सेवा
स्थानिक उत्पादने, हस्तकला, शेतीपूरक व्यवसाय

रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी
युवकांसाठी टूर मॅनेजमेंट, साहसी पर्यटन, डिजिटल मार्केटिंग
महिलांसाठी होमस्टे, स्थानिक खाद्यसंस्कृती, बचतगट उद्योग
शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्रो-टुरिझम व थेट विक्री संधी

शेती ते आयटी पार्क विकासाचा समतोल
परंपरागत शेती, ग्रामीण जीवनशैली आणि आधुनिक आयटी पार्क्स व औद्योगिक विकास यांचा सुंदर समतोल मुळशी तालुक्यात दिसून येतो. ‘ग्रँड चॅलेंज टूर’मुळे हा विकास अधिक समावेशक (Inclusive Growth) होणार आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी नवा अध्याय
‘ग्रँड चॅलेंज टूर’मुळे मुळशी तालुका आंतरराष्ट्रीय पर्यटक, गुंतवणूकदार व पर्यटन अभ्यासकांसाठी एक आदर्श मॉडेल ठरणार असून, शाश्वत पर्यटन विकासाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. मुळशीचा निसर्ग, संस्कृती,रोजगार आणि विकास यांचा जागतिक चेहरा अशी नवी ओळख या उपक्रमातून निर्माण होईल.

2832, 2834

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com