भैरवनाथ उत्सवानिमित्त कोळवण येथे हरिनाम सप्ताह
कोळवण, ता. २ ः कोळवण (ता. मुळशी) येथील भैरवनाथ मंदिर प्रांगणात श्रीभैरवनाथ जोगेश्वरी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व वार्षिक उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाचे आयोजन शनिवार (ता. ३) ते शनिवार (ता. १०)पर्यंत केले आहे. सप्ताहाचे हे ६१वे वर्ष असून या सप्ताहात पहाटे काकडआरती, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, रात्री कीर्तन त्यानंतर हरिजागर होणार असून शनिवारी (ता. ३)प्रमोद महाराज पवार, रविवारी (ता. ४) भूषण महाराज पाटील, सोमवारी (ता. ५) गौतम महाराज जाधव, मंगळवारी (ता. ६) शंकरनाना मोरे , बुधवारी (ता. ७ ) धनंजय महाराज भगत, गुरुवारी (ता. ८) भागवत महाराज साळुंके, शुक्रवारी (ता. ९) ओंकार महाराज दुडे शास्त्री, शनिवारी (ता. १०) जयराम महाराज तांगडे यांचे काल्याचे कीर्तन, सायंकाळी भैरवनाथ पालखी मिरवणूक आणि रात्री श्री राम कला पथक पवळेवाडी यांचा भजनी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सप्ताहातील कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळी व पांडुरंग भजनी मंडळ कोळवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

