कोळवणला प्रतिमेस पुष्पहार अर्पण
कोळवण, ता.२९ : कोळवण (ता. मुळशी) येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी (ता.२९) सकाळी ११ वाजता सर्व पक्षीय शोकसभा आयोजित केली होती. यामध्ये सर्व नेत्यांनी पवार यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन खैरे, भाजपचे पदाधिकारी मधुरा दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बबन धिडे, न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अकबर मुलाणी, शिवसेना शिंदे पक्षाचे भाऊ आखाडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव अविनाश बलकवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुखदेव मांडेकर, बौद्ध धम्म दहा कमिटीचे बाळासाहेब गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक यशवंत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद वाळंज, प्रवीण धनवे, संतोष पेरणेकर, गणपत मेंगडे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेश पारखी, शिवसेना ठाकरे पक्षाचे नामदेव टेमघरे, माऊली महाराज साठे, यांनी आपल्या भाषणातून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रत्येकाने दादांच्या आठवणी जागविल्या.
सर्वांनी सामुहिक पसायदान म्हणून दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,आरपीआय, वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, बौद्ध धम्म दहा गाव विकास संस्था, न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना, न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक निवेदिता पोळ व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
02919
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

