कोळवण परिसरातील गावांत
विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोळवण परिसरातील गावांत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Published on

कोळवण, ता. ५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त कोळवण परिसरातील विविध गावांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये सकाळी परिसरातील किल्ल्यांवरून शिवज्योत आणने, शिवाजी महाराज यांचे प्रतिमापूजन, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक, महाप्रसाद भोजन, कीर्तन, प्रबोधनपर व्याख्याने असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
काशिग येथे गुरुवारी (ता. ५) सायंकाळी शिवशाहीर किशोर महाराज कोकाटे यांचे कीर्तन, शुक्रवारी (ता. ६) साठेसाई येथे दुपारी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक तर, रात्री नऊ वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम, कोळवण येथे सायंकाळी बालाजी महाराज काशीद यांचे शिवव्याख्यान, भालगुडी येथे रात्री जनार्दन महाराज मालपुटे यांचे कीर्तन, होतले येथे सायंकाळी श्री सद्गुरू कला क्रीडा मर्दानी खेळ यांचे मैदानी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक, नांदगाव येथे कविराज महाराज झावरे यांचे शिवचरित्रावर आधारित कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन कोळवण खोऱ्यातील तरुणाईने आयोजित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com