

कोळवण, ता. ३१ ः नाणेगाव (ता. मुळशी) येथील भैरवनाथ मंदिर प्रांगणात श्री भैरवनाथ, विठ्ठल रुक्मिणी व हनुमान उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मंगळवार (ता. ३१) मार्च ते शुक्रवार (ता. ३) एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे.
सप्ताहात पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद व हरिजागर आदी कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी (ता. ३१) श्रीकांत महाराज पातकर, बुधवारी (ता. १) राजेंद्र महाराज येप्रे, गुरुवारी (ता. २) ज्ञानेश्वर महाराज वाबळे, शुक्रवारी (ता. ३) बाळकृष्ण महाराज गोगावले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सायंकाळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ पालखी मिरवणूक रात्री अकरा नंतर भैरवनाथ मुळशी मावळ तालुका वारकरी संप्रदाय यांचे भजन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.