honeytrap
honeytrapesakal

Honeytrap : हनीट्रॅपचा प्रयत्न स्वत:वरच उलटला; शिक्रापुरातील दांपत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवरील झगमगाटी चेहऱ्याला उद्योजक भुलला आणि थेट शिक्रापुरात तिच्या घरीच भेटायला आला.

शिक्रापूर - येथील विवाहिता पूनम परशुराम वाबळे हिच्या इन्स्टाग्रामवरील झगमगाटी चेहऱ्याला कुरकुंभ (ता. दौंड) येथील राहुल झगडे नामक उद्योजक भुलला आणि थेट शिक्रापुरात तिच्या घरीच भेटायला आला. या भेटीचा व्हीडिओ पूनमचा पती परशुराम याने काढला आणि याच व्हीडिओचे भांडवल या उभयतांनी करीत सुरुवातीला २५ हजार रुपये झगडे याचेकडून वसूल तर केलेच शिवाय झगडेकडून आणखी पाच लाख रुपये आणि एका फ्लॅटची मागणी केली. अर्थात नवरा-बायकोने मिळून टाकलेल्या या हनीट्रॅपमध्ये दोघेही स्वत:च फसले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकले.

याबाबत तपास अधिकारी फौजदार माधुरी झेंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पूनम परशुराम वाबळे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांची इन्स्टाग्रामवर कुरकुंभ येथील उद्योजक राहुल झगडे याच्याशी ओळख झाली. ही ओळख पुढे मैत्रीत रुपांतरीत झाल्याने झगडे याला पूनमने शिक्रापूरला तिच्या घरी भेटायला बोलावले. हे दोघे केवळ बोलत असतानाचा व्हीडिओ पूनमचा पती परशुराम याने गुपचूप काढला आणि झगडे याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

सततच्या फोनच्या त्रासाला कंटाळून परशुरामला झगडे याने २५ हजार रुपये दिले. मात्र वाबळे दांपत्याची भूक काही संपेना. पुढे पूनम हिने झगडेला हे संपूर्ण प्रकरण मिटविण्यासाठी तू शिक्रापुरात ये म्हटले. त्याप्रमाणे तो मंगळवारी (ता. २३) शिक्रापूरला आला. या वेळी त्याच्याकडे पाच लाख रुपये किंवा एक फ्लॅट घेऊन देण्याची मागणी या दोघांनी केली.

याबाबत झगडे याने शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार केली असता, पूनम परशुराम वाबळे व परशुराम अंकुश वाबळे या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात आरोपी परशुराम याला तत्काळ अटक करण्यात आली असून, पूनम ही फरार असल्याने तिला पकडण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

honeytrap
Shkrapur Crime : ‘तू माझ्यासोबत चल नाहीतर मी आत्महत्या करेन,’ अशी धमकी दिली आणि तिला थेट पळवूनच नेले.

फसवणुकीच्या तक्रारी थेट दाखल करा

सोशल मीडियावर मैत्री करून फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत. मात्र अनेकजण भीतीपोटी पोलिसांकडे येत नाहीत. याबाबत कुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व फौजदार माधुरी झेंडगे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com