शिक्षकांवर मोटार, बुलेट, दागिन्यांची बरसात

शिक्षकांवर मोटार, बुलेट, दागिन्यांची बरसात
Published on

शिक्रापूर, ता. १७ : विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करा आणि दुचाकी-चारचाकी आणि सोन्याची आभूषणे मिळवा, अशी शिक्षकांसाठीची प्रोत्साहनपर योजना हिवरे कुंभार (ता. शिरूर) आणि कोयाळी पुनर्वसन येथील जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी जाहीर केली होती. त्यात हिवऱ्यातील बाबासाहेब गोरडे यांना मोटार, कोयाळी पुनर्वसन शाळेतील मेघा संतोष धुमाळ-जाधव यांना मोटार, उद्धव गरकळ यांना बुलेट; तर रत्नप्रभा कामठे यांना दुचाकी; तर अन्य ७ मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिकांना अंगठी व नेकलेस भेट देण्यात आली.

हिवरे-कुंभार येथील शाळेत आतापर्यंत सुमारे ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी पूर्वीच्या इयत्ता चौथी व आताच्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतून जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत चमकले. पर्यायाने ग्रामस्थ-पालकांनी यापूर्वीच्या १८ शिक्षकांना दुचाकी देऊन त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. यावर्षी १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्याच्या यशाचे श्रेय गोरडे यांना देत ग्रामस्थांनी मोटार भेट दिली. हिवरे ग्रामस्थांनी आतापर्यंत शिक्षकांना तब्बल १८ दुचाकी दिल्या असून, आता त्यांनी मोटार भेटीचा उपक्रम सुरू केला आहे.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शुकराज पंचरास, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिक जगताप, उपाध्यक्ष राजश्री तांबे, सरपंच दीपाली खैरे, उपसरपंच दीपक खैरे, माजी सरपंच शारदा गायकवाड, राजाराम गायकवाड, विकास शिर्के, अमोल जगताप, विठ्ठल जाधव, रेवणनाथ गायकवाड, मोहन खैरे, रेवणनाथ जाधव, प्रवीण टाकळकर, जालिंदर मांदळे, शरद तांबे, अरुण साळुंके, राजेंद्र साळुंके, दादाभाऊ जाधव, जालिंदर थोरात आदी उपस्थित होते.
अशाच पद्धतीने शिक्रापूर येथील कोयाळी-पुनर्वसन शाळेतील मेघा संतोष धुमाळ-जाधव यांच्या इयत्ता पाचवीच्या वर्गातील १९ विद्यार्थी, तर रत्नप्रभा कामठे यांच्या वर्गातील २५ आणि उद्धव गरकळ यांच्या वर्गातील १४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. त्यामुळे त्यांना चारचाकी व दुचाकी देण्यात आल्या. या शिवाय प्रियांका बिऱ्हाडे (१८ विद्यार्थी), स्विटी खरात (१), विजय आढळ (३), शोभा जगताप (१०), शशिकला सोनवणे (३), मनीषा दसगुडे (१५) व शुभांगी आबनावे (१३) यांचे कंसातील विद्यार्थी यशस्वी झाले. त्यामुळे सर्वांना सुवर्णमुद्रीका व नेकलेस पालकांनी भेट दिले.
सर्व भेटवस्तू सरपंच रमेश गडदे, माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, त्रिनयन कळमकर, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, शालन राऊत, अध्यक्ष अविनाश करंजे, सदस्य रवींद्र पाटील, मुख्याध्यापिका शशिकला सोनवणे, नाना काळोखे, कांताराम गिलबीले, रोहिणी गिलबीले, पालक संदीप परदेशी, संतोष बगाटे, मोहन बोराटे, कैलास भुजबळ, व्ही. व्ही. वारे, बी. बी. आत्राम आदींच्या हस्ते देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com