चाऱ्याचा पैस थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

चाऱ्याचा पैस थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
Published on

शिक्रापूर, ता. २८ : राज्यात यावर्षी झालेले अत्यंत कमी पर्जन्यमान आणि दुष्काळसदृश स्थितीचा आढावा घेता राज्य सरकारसाठी चारा छावण्यांची तत्काळ उभारणे तितकीशी सुलभ आणि कार्यवाहीसाठी सोपी वाटत नाही. त्यामुळे या वर्षी राज्य सरकार शेतकऱ्यांना त्यांचे पशुधन संभाळण्यासाठीची आर्थिक मदत थेट बॅंक खात्यात देण्याच्या विचारात असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
केंदूर (ता. शिरूर) येथील एका कार्यक्रमादरम्यान काही शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पऱ्हाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना वळसे पाटील यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या वर्षी केंद्राच्या दुष्काळ निकषात राज्यातील केवळ ४० गावेच बसल्याने राज्य सरकारने स्वतंत्र सर्व्हेक्षण करून राज्यातील ९५९ मंडले दुष्काळ प्रवण म्हणून जाहीर केली गेली. केंद्र आणि राज्यातील सदर दुष्काळ जाहीर पद्धत वेगळी असली, तरी मदतीचे निकष एकच आहेत.
पहिल्या टप्प्यातील पाऊस आणि परतीच्या मान्सूनचा पाऊस या सर्वांची टक्के वारी अतिन्यूनतम राहिली आहे. सद्यःस्थिती ठिक असली, तरी येत्या काही दिवसातच राज्य सरकारने सर्व्हेक्षण करून जाहीर केलेल्या ९५९ मंडलातील सर्व गावांमधील पशुधन जगविणे शेतकऱ्यांसाठी आव्हान असणार आहे. पर्यायाने हे सर्व पशुधन जगविण्याची जबाबदारी सरकार म्हणून आम्ही टाळणार नाही. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात तत्काळ चारा छावण्या उभ्या करणे कसे शक्य आहे, हे तपासताना राज्य सरकारने आता यावर पर्याय काढला असून, त्यानुसार पशुधन जगविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात पैसे वर्ग करून त्यातून पशुधनाची शेतकऱ्याने काळजी घ्यावी, असे सरकारला अपेक्षित आहे. याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला नसला, तरी याबाबत शासन अत्यंत गंभीरपणे विचार करीत असून, सदर निर्णय दृष्टिपथात आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या वेळी माजी सभापती प्रकाश पवार, आंबेगाव-शिरूर विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

शेतकऱ्यांना ३६००० कोटींची कर्जमाफी! mantralay
Assessing the Devastation: ZP Vice President Visits Storm-Hit Lakhangaon
Irrigation Lifeline: Dilip Walse Patil Secures Positive Assurance from MSEDCL for Dhamani Farmers
Crop Insurance
Marathi News Esakal
www.esakal.com