शिरूर तालुक्यात एकनंबरी स्कूल : अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यू.कॉलेज, शिक्रापूर

शिरूर तालुक्यात एकनंबरी स्कूल : अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यू.कॉलेज, शिक्रापूर

Published on

शिरूर तालुक्यात एकनंबरी स्कूल : अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यू.कॉलेज, शिक्रापूर

विद्यार्थी नर्सरीत दाखल झाला की, तो त्याच्या कलाप्रमाणे मेडिकल, इंजिनिअरिंग, स्पर्धा परीक्षा तथा त्याच्या आवडीनुसारच्या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी सज्ज होण्यापर्यंतचे काम ज्या शिक्रापूरातील अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन २०१४ पासून केले जातेय, त्या परिश्रमाच्या यशातील परावर्तित चित्र आता दिसू लागले आहे. सहा एमबीबीएस डॉक्टर्स, २५ बीएएमएस डॉक्टर्स, ३ आयआयटीएन्स, १८ एनआयटीएन्स, ४ पुण्यातील सीओईपीमध्ये तर ४ पिंपरी-चिंचवड इंजिनिअरिंग महाविद्यालयात अशा यशस्वी विद्यार्थ्यांची यादीच अजिंक्यताराकडून जाहीर करण्यात आली आहे. शिक्रापूर परिसर शिक्षण क्षेत्रात अग्रेसर का आहे, तर त्याचे उत्तर येथील अजिंक्यतारा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये दाखल असलेल्या प्रत्येक विद्यार्थी-पालकांच्या प्रतिक्रियेतूनच मिळते हेच या शाळेचे वैशिष्ट्य आणि शिरूर तालुक्यात ही शाळा एकनंबरी असण्याचे कारणही.

स्थापना सन २०१४ ची अन तालुक्यात अव्वल...!
शिरूर केसरी ही तालुकास्तरीय कुस्तीस्पर्धा पुणे जिल्ह्यात ज्यांनी सुरू करून राज्याच्या कुस्ती आखाड्यांमध्ये तालुका कुस्त्यांचे फड कसे आयोजित करावेत याचे धडे दिले ते पैलवान व शिक्रापूरनगरीची ग्रामपंचायत इमारत उभी करून विक्रमी निधीची विकासकामे केलेले आदर्श सरपंच रामभाऊ सासवडे यांच्या कल्पनेतील ही शाळा. प्रचंड शिस्त, विद्यार्थी-पालक-शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना शिस्तीचे धडे या शाळेतून मिळालेच पाहिजेत हा शिरस्ता रामभाऊंनी घालून दिला आणि सन २०१४ मध्ये नर्सरी ते चौथीपर्यंतची शाळा अजिंक्यतारा ग्रुपने सुरू केली. पुढे एकेक वर्ग वाढवून सन २०१९-२० मध्ये पहिला इयत्ता दहावीचा वर्ग परीक्षेला बसला आणि शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा सुरू करीत आजही कायम ठेवली आहे. अर्थात संस्थेचा संपूर्ण कार्यभार आणि व्यवस्थापन संस्थेचे सचिव भाऊसाहेब कापरे हे स्वत: दिवसभर शाळेत उपस्थित राहून करतात तर कार्याध्यक्ष श्यामराव सासवडे यांच्याकडून शाळेतील सर्व टीमचा समन्वय राखला जातो. म्हणूनच शाळेची विकासगती आश्चर्यचकित करणारी आहे.

१० विद्यार्थी ते १५०० विद्यार्थी :
अगदी पहिल्या वर्षी जेमतेम १० विद्यार्थी-पालकांनी विश्वास ठेवलेल्या अजिंक्यतारा ग्रुपचा विद्यार्थीसंच आजच्या तारखेला आहे तो तब्बल १५०० विद्यार्थ्यांचा. पहिल्या दहावीच्या बॅचमध्ये विद्यार्थी होते २८ तर बारावीसाठी जेमतेम ३४. चालू वर्षी दहावीला ७६ तर बारावीला तब्बल ११९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

प्रवेश वाढण्याची खरी कारणे
- पहिल्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची तयारी
- इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशीपची तयारी इयत्ता चौथीपासूनच सुरू केली जाते.
- इयत्ता आठवीच्या स्कॉलरशीपची तयारी इयत्ता पाचवीच्या परीक्षेपासूनच सुरू केली जाते.
- मंथन परीक्षेचा सर्वोत्तम निकाल दरवर्षी काढला जातो.
- अभिरूप परीक्षेतही शाळेचे विद्यार्थीच अव्वल स्थानी राहतात.
- ऑलंपियाड परीक्षेसाठीची तयारी हे शाळेचे वैशिष्ट्य आहे.
- इयत्ता ९वी व दहावी पासूनच IIT / NEET / Foundation ची तयारी केली जाते.
- इयत्ता ११वी व १२ अभ्यासक्रमाबरोबरच बोर्ड परीक्षा-नीट परीक्षा - जेईई - सीईटी व एमसीटी आदींची कसून तयारी करून घेतली जाते.
- विद्यार्थी-विद्यार्थिनींची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था.
- शाळेभोवती व शाळेच्या बाहेरील बाजूसही संपूर्ण आवाजासह सीसीटिव्हीचे संरक्षण कवच.

शाळेचे हेच वेगळेपण जिल्ह्यातील अव्वलता सिद्ध करते :
- थ्रीडी इंटरॅक्टीव्ह लॅबरॉटरी
- इयत्ता १ली ते १२ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सायन्स कटेंट क्लिअरन्स मिनी थिएटर उपलब्ध
- मिनी थिएटरची सध्याची एकावेळची ७० विद्यार्थी क्षमता लवकरच २०० विद्यार्थी क्षमतेपर्यंतचा प्रकल्प अंतिम टप्प्यात.
- फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजीसाठी तीन स्वतंत्र लॅब उपलब्ध

- शालेय अभ्यासक्रमासह शाळाबाह्य ज्ञानशाखेची मुबलक पुस्तके उपलब्ध असलेली मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र लायब्ररी
- प्रत्येक वर्गात सीसीटिव्ही आणि ऑनलाइन लेक्चर्ससाठी टेलिव्हिजनही
- पालक व विद्यार्थी यांना सामावून घेणारे आयाआयटी/जेईई/नीटसाठी स्वतंत्र अ‍ॅप्स.


क्रीडाप्रकारात तर शाळेची वेगळी ओळख :
- खो-खो, कबड्डी, लांब उडी, उंच उडी, भाला फेक, गोळा फेक व धनुर्विद्यासाठी स्वतंत्र क्रीडांगण
- क्रिकेटसाठी स्वतंत्र मैदान
- इनडोअर क्रीडाप्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था
- इनडोअरमधील टेबल टेनिस, कॅरम व चेससाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था

प्रशिक्षित शिक्षक-प्राध्यापक व इतर स्टाफ :
- इयत्ता नववी ते इयत्ता बारावीसाठी नॉन-महाराष्ट्रीयन १६ शिक्षकवृंद
- इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीसाठी उच्च गुणवत्ता असलेले ३० शिक्षकवॄंद
- स्कॉलरशीप व स्पर्धा परीक्षांची विद्यार्थी मानसिकता बनविण्यापासून ते प्रत्यक्षात गुणसंपन्नपर्यंत नेणारे शिक्षकवॄंद
-

संस्कारांची शाळा आणि पालकांचा आदर करणारे विद्यार्थी :
- शाळेत दरवर्षी माता-पिता पूजन दिवस
- दरवर्षी अन्य ठिकाणी तीन दिवस मुक्कामी संस्कार शिबिर
- शेती संस्कार-नेतृत्वगुण-सामाजिक जाण विकसित करणारी दर तीन महिन्याला शिबिरे
- दर फेब्रुवारीमध्ये भव्य सायन्स डे अन प्रत्येक विद्यार्थी सहभागाचे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
- विद्यार्थ्याची शाळा आणि शाळाबाह्य प्रगतीचा आढावा घेणारी पालकसभा दर महिन्याला

संस्थाविस्तार लवकरच होतोय :
- सध्याचे क्रीडासंकुल व शाळाविस्तार दोन एकरात आहे
- लवकरच आणखी १५ एकरात शाळा व संस्थाविस्तार करण्याची तयारी सुरू
- शाळेत लवकरच BCS /BCA / Nursing / D.Pharm /B. Pharm./ BBA / BCA आदी शिक्षण सुविधा
- मुलींची स्वतंत्र शाळाही लवकरच सुरू होणार
- बाहेरगावचे आणि केवळ शिक्षणाला वाहिलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी पूर्ण सुरक्षित निवासी (होस्टेल) शाळाही लवकरच सुरू

अजिंक्यतारा इंग्लिश मीडिअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, हिवरे रोड, शिक्रापूर
मो : ९८२२२-८६४१९
मा.श्री. पै. रामभाऊ सासवडे (संस्थापक अध्यक्ष)
मा. पै. श्‍यामराव सासवडे (कार्याध्यक्ष)
मा. श्री. भाऊसाहेब कापरे (सचिव)
प्रा. संतोष मासळकर (प्राचार्य)
प्रा. तुषार डोके (उपप्राचार्य)

03700, 03701, 03702, 03704

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com