सणसवाडी उत्खननाचा पंचनामा सदोष असल्याची तक्रार

सणसवाडी उत्खननाचा पंचनामा सदोष असल्याची तक्रार
Published on

सणसवाडी, ता. ३ : येथील इस्पात परिसरातील बेकर्ट कंपनीच्या २५० गुंठ्यात स्फोट करून उत्खनन केल्याच्या प्रकरणात महसूल विभागाने मंगळवारी (ता. १) तातडीने पंचनामा केला, पण त्यात उत्खनन प्रक्रियेत वापरलेली ११ वाहने व मशिनरींचा समावेशच टाळला आहे. या उत्खननात घातक स्फोटके वापरली गेली असतानाही या सर्व बाबींना पंचनाम्यात न घेतल्याने सदोष पंचनाम्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांनी या सर्व बेकायदा कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्र काढून पुरावे संकलित केले असून, सदर स्फोटक रसायनांचे अंशही महसूल विभागाला देणार असल्याचे सांगितले.
याबाबत पंचनामा केलेले तलाठी गोविंद घोडके यांनी सांगितले की, पंचनाम्यात वाहनांचा समावेश राहिला असून, सर्व वाहने व जेसीबी-पोकलेन यांचेसह पंचनामा तहसीलदारांकडे सादर करीत आहोत. याबाबत कंपनीचे संचालक पुनीत वीज यांचेकडे आजही संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सुरुंग लावण्यासाठी व स्फोट घडवून आणण्यासाठीचा १ ट्रॅक्टर, ५ पोकलेन, २ हायवा, १ जेसीबी, १ रोलर व १ क्रशर अशी एकूण ११ प्रकारच्या मशिनरी आणि वाहने पंचनामा केलेल्या ठिकाणी उभी असून, अशा सर्व वाहनांचा पंचनाम्यात सहभाग व्हायलाच हवा होता. मात्र तो का झाला नाही, याबाबत तलाठी घोडके यांच्याशी आपण बोलू, असे मंडलाधिकारी यांनी सांगितले.
तलाठ्यांनी केलेला पंचनामा गंभीर असून, आम्ही या प्रकरणी तहसीलदार, जिल्हाधिकारी व पोलिसांकडेही धाव घेणार आहोत. या प्रकरणी सरपंच-उपसरपंच व तक्रारदारांच्या उपस्थितीत पुन्हा पंचनामा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याचे अ‍ॅड. विजयराज दरेकर व सागर दरेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com