कोंढापुरीतील नागरिकांनी पकडले मोबाईल चोर
शिक्रापूर, ता. ४ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील दोन घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून मोबाईल चोरून चाललेल्या दोन चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विष्णू सुभाष चव्हाण (वय २७, रा. मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे, मूळ रा. कोसदरी ता. आरणी, जि. यवतमाळ) व आकाश मच्छिंद्र जाधव (वय २८, रा. मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे, मूळ रा. करमाळा, जि.सोलापूर) अशी चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, कोंढापुरी (ता. शिरूर) येथील नीलेश भोर व पवन चौहान हे दोघे युवक घराला कुलूप लावून सकाळी नऊच्या सुमारास कामाला गेले असताना दुपारी दोनच्या सुमारास या दोघांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केल्याचे जवळच राहत असलेल्या काही स्थानिकांच्या लक्षात आले. दोन्ही चोरटे घरातून बाहेर पडताना त्यांच्या हातात मोबाईल असून पळून जात असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी दोघांना झडप घालून पकडले व त्यांना चोरीच्या मोबाईलसह शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, अल्पावधीतच नीलेश कामावरून आल्यानंतर त्याला दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसल्याने त्याने चौकशी केली असता घडलेला प्रकार समोर आला. याबाबत नीलेश भोर (रा. कोंढापुरी, ता.शिरूर, जि.पुणे, मूळ रा. रेणवडी, ता. जुन्नर) याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात येथे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी विष्णू चव्हाण व आकाश जाधव या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार चंद्रकांत काळे पुढील तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

