पिंपळे जगताप येथे मोटारीच्या
धडकेत महिलेचा मृत्यू

पिंपळे जगताप येथे मोटारीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Published on

शिक्रापूर, ता. १९ ः पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथील शिक्रापूर-चाकण रस्त्यावर झालेल्या मोटार व दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. अश्विनी गणेश सासवडे असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा रुद्र सासवडे याने प्रसंगावधान राखून दुचाकीवरून उडी मारल्याने सुदैवाने तो बचावला. दरम्यान, अपघातग्रस्त चारचाकीचा चालक घटनेनंतर फरार झाला. शिक्रापूर पोलिसांनी मोटारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.१७) चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील पिंपळे जगताप येथील आपल्या गीतांजली हॉटेलमधून अश्विनी सासवडे या त्यांचा मुलगा रुद्र (वय ११) याला आपल्या दुचाकीवरून शिक्रापूर बाजूकडे चाललेल्या असताना शिक्रापूर बाजूने समोरून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने अश्विनी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. याच वेळी आपल्या दुचाकीच्या समोरून चारचाकी वाहन भरधाव वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून दुचाकीचे पाठीमागे बसलेल्या रुद्र याने दुचाकीवरून उडी मारून तो बाजूला पळून गेला. ही धडक इतकी जोरदार होती की, अश्विनी सासवडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. या धडकेनंतर मोटार रस्त्याच्याकडेला चारीमध्ये गेली व वाहनचालक वाहन सोडून पळूनही गेला. दरम्यान स्थानिकांनी अपघातग्रस्त अश्विनी सासवडे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी अश्विनी गणेश सासवडे (वय २८, रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू घोषित केले. याप्रकरणी गणेश बाळासाहेब सासवडे (वय ३५, रा.पिंपळे जगताप, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोटारचालकावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश करपे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com