पुरस्कार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी पाठबळ देणार : वळसे पाटील

पुरस्कार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी पाठबळ देणार : वळसे पाटील
Published on

शिक्रापूर, ता. ७ : ‘‘शिरूर तालुक्यातील तब्बल १५ कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांना आपल्या आई-वडिलांच्या नावाने सुरू केलेल्या सुंदरबाई पवार स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करीत जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथील पवार परिवाराने चांगला पायंडा पाडला अहे. जातेगाव बुद्रुक भूषण दत्तात्रेय वारे व महिला बचत गटांसाठी भरीव योगदान दिलेल्या सुवर्णा साकोरे यांच्यासह सर्व पुरस्कार्थींचे कर्तृत्व समजून घेण्यासाठी यातील प्रत्येक पुरस्कार्थ्याला आपण वैयक्तिक भेटून त्यांना पाठबळ देणार आहे,’’ माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले.

शिरूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी जे-जे कुणी मोठे योगदान देत आहेत त्यांना सुंदरबाई पवार स्मृती गौरव पुरस्कार या आपल्या आईच्या नावाने देण्याची परंपरा माजी सभापती प्रकाश पवार, उद्योगपती सदाशिवराव पवार, कात्रज संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, कृषिनिष्ठ शेतकरी सुरेश पवार व केंदूरच्या माजी सरपंच मीनाताई साकोरे यांनी सुरू केली आहे. त्यातील पहिल्या वर्षातील १५ पुरस्कार्थ्यांना पुरस्कार वितरण नुकतेच वळसे पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, हवेली बाजार समितीचे माजी सभापती पंढरीनाथ पठारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त आयुक्त कांतिलाल उमाप यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

दरम्यान, प्रकाश पवार यांचे वडील कै.बाबासाहेब पवार तसेच केशरताई व सदाशिवराव पवार यांचे चिरंजीव कै.अतुल पवार यांच्या नावानेही काही पुरस्कार यावेळी वितरित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पंकज महाराज गावडे यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमाला माजी आमदार पोपटराव गावडे, कुसुम मांढरे पाटील, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, विष्णूकाका हिंगे, दादा पाटील फराटे, रवींद्र काळे, शंकर जांभळकर, सुभाष उमाप, प्रमोद पऱ्हाड, शशिकांत दसगुडे, सुनील वडघूले, भगवानराव शेळके, अ‍ॅड.सुरेश पलांडे, उद्योगपती बाळासाहेब सातव, कुशाभाऊ गावडे व सर्वस्तरांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या’ १४ मान्यवरांना पुरस्कार
जातेगाव बुद्रुक भूषण पुरस्कार दत्तात्रेय वारे गुरुजी, महिला उन्नती पुरस्कार सुवर्णा साकोरे, उद्योगरत्न पुरस्कार तुषार काळे, उत्कृष्ठ संस्थाचालक पुरस्कार राजीव फराटे, विशेष ग्रामविकास पुरस्कार दीपक खैरे, उत्कृष्ट शिक्षणसेवा पुरस्कार प्रा.रामदास थिटे, प्राचार्य अनिल साकोरे, सोमनाथ भंडारे यांना देण्यात आले तर राहुल भिवरे यांना उद्योगरत्न, ज्ञानेश्वर मुंडलिक यांना सामाजिक सेवा, रूपेश बेद्रे पाटील यांना उद्योगरत्न, डॉ.मिलिंद भोसुरे यांना अध्यात्मसेवा, श्रीपतराव नवले यांना सामाजिक सेवारत्न व बबनराव जाधव यांना सामाजिक सेवा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

04342

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com