शिरूरच्या गुणवत्ता संवर्धन तपासणीत तीन शाळा प्रथम

शिरूरच्या गुणवत्ता संवर्धन तपासणीत तीन शाळा प्रथम

Published on

शिक्रापूर, ता. १८ : शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत शिरूर तालुक्यातील १३६ माध्यमिक शाळांची तपासणी नुकतीच पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली. यात ५०० पटापर्यंतच्या शाळा विभागात धामारी येथील न्यू इंग्लिश स्कूल, १ हजार विद्यार्थी पटापर्यंतच्या शाळांमध्ये रामराव गेणुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा तर १ हजार पटापुढील शाळा विभागात शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपापल्या विभागात प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत चालू वर्षासाठी शिरूर तालुक्यातील १३६ शाळांची तपासणी नुकतीच पूर्ण झाली. ही तपासणी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आली होती. ५००, १००० आणि १ हजारांहून अधिक विद्यार्थी पट अशा तीन विभागात ही तपासणी करण्यात आली. सदर तीनही विभागातील पहिल्या तीन क्रमांक प्राप्त केलेल्या शाळा आणि त्यांनी मिळविलेले गुण पुढील प्रमाणे.
५०० विद्यार्थी पट विभाग : न्यू इंग्लिश स्कूल, धामारी (८९.६६ गुण), संभाजीराजे पलांडे पाटील प्रगती हायस्कूल, मुखई (८७), न्यू इंग्लिश स्कूल, भांबार्डे (८३.५०).
१००० विद्यार्थी पट विभाग : रामराव गेणुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा, मुखई (९५.६२), विद्या विकास मंदिर, निमगाव म्हाळुंगी (९४), बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी-हाजी (९१.६६).
१००० विद्यार्थी पटसंख्येपुढील विभाग : चांदमल ताराचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालय, शिरूर (९९.११), संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जातेगाव बुद्रुक (९८.३०), नरेश्‍वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, सणसवाडी (९७).

शिरूर मध्ये एकूण १५० माध्यमिक शाळा असून त्यातील १३६ शाळांची तपासणी वेगवेगळ्या ३० निकषांच्या आधारे एका तपासणी पथकाद्वारे करण्यात आली. ज्यांना कमी गुण मिळालेले आहेत त्या शाळांबाबत पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांना काय सूचना द्यायच्या याबाबत निर्णय घेणार आहे.
बाळकृष्ण कळमकर, गटशिक्षणाधिकारी, शिरूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com