

शिक्रापूर, ता. १४ : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार आणि दुसरे लग्न करून पुन्हा लैंगिक अत्याचार करीत युवतीला फसवून तिचा छळ करणाऱ्या कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथील अजय कैलास साळुंखे (वय ३०) याच्यावर शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांनी बलात्कार, छळ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, अजय साळुंखेयाने शिक्रापूर भागातील एका युवतीची ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या युवतीला सतत लग्नाचे आमिष दाखवीत त्याने तिला झुलवत ठेवले. ही बाब युवतीच्या लक्षात आल्यावर तिने लग्नाच आग्रह सुरू केला. या दरम्यान आरोपी अजय याने गुपचूप दुसऱ्या युवतीशी लग्न केले. याबाबतची माहिती पीडित युवतीला समजल्यावर तिने पोलिसांकडे जाण्याचा इशारा आरोपीला दिला. यावर त्याने या युवतीला हे प्रकरण मिटवून म्हणत रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे भेटायला बोलावले. यावेळी पुन्हा पिडीतेची समजून काढण्याच्या बहाण्याने कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका मित्राच्या खोलीवर नेले. तिथेही त्याने पुन्हा लैंगिक अत्याचार केला. सतत फसवणूक व लैंगिक अत्याचाराने त्रस्त झालेल्या पीडित युवतीने अखेर शिक्रापूर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार अजय याच्यावर बलात्कार, छळ, फसवणूक, मारहाणीचा गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहिणी सोनावले करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.