केंदूरमध्ये जलआत्मनिर्भरतेसाठी वर्षभराचे नियोजन

केंदूरमध्ये जलआत्मनिर्भरतेसाठी वर्षभराचे नियोजन

Published on

शिक्रापूर, ता.२५ : जलआत्मनिर्भरतेसाठी केंदूर (ता.शिरूर) येथील युवक आणि पाणीदार केंदूर प्रकल्पातील ग्रामस्थांनी गावातील जलसंधारणाच्या कामासाठी मदत करणाऱ्या कंपन्यांना गावात आमंत्रित केले व पुढील वर्षभराच्या नियोजनासाठी बैठक घेतली. जलपुरुष राजेंद्रसिंह यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गावात मोठी जलजागृती सुरू केली. त्यास उत्स्फूर्तपणे सहभाग घेत केंदूरला जलआत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा असल्याचे या बैठकीत सर्वांनीच मान्य केले.
जागतिक जलदिन म्हणून दरवर्षी २२ मार्च जगभर आयोजित केला जातो. हेच औचित्य साधून पाणीदार केंदूर उपक्रमांतर्गत केंदूरकरांनी गावाच्या जलसंधारण कामासाठी मदत करीत असलेल्या थ्रीएम कंपनी, वॉटर फॉर पीपल ट्रस्ट व त्यांच्या कंपन्यांना गावात बोलावून घेतले व त्यांच्यासमवेत पुढील वर्षभराचे कामाचे नियोजन केले. गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हाती जलसाक्षरतेचे फलक, घोषणा आणि पाण्याचे महत्त्व सांगणारे संवाद आयोजित करून ग्रामफेरी झाली. यानंतर या कामी मदत करणारे यशदाचे समन्वयक डॉ.सुमंत पांडे यांचे आभार मानत सरपंच प्रमोद पऱ्हाड यांनी संपूर्ण कामाचा आढावा घेतला.

दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेत नैपूर्ण्य मिळविलेल्या लहानगटातील प्रणिती गंगाराम थिटे, श्लोक रमेश विधाटे, श्रावणी सुभाष ताठे आणि मोठ्या गटातील जान्हवी तुकाराम पऱ्हाड, अन्वयी राजेश थिटे व अविनाश सतीश सुक्रे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, थ्रीएम कंपनीचे संभाजी पठाडे, सरपंच प्रमोद पऱ्हाड, शालन भोसुरे, राम साकोरे, भरत साकोरे, सूर्यकांत थिटे, अमोल थिटे, अभिजित साकोरे, सतीश थिटे, महादेव पाटील, योगिता थिटे, भाऊसाहेब थिटे, बन्सी पऱ्हाड, उमेश साकोरे, पंडित सुक्रे, सुदाम पऱ्हाड, चंद्रकांत सपकाळे, यशवंत बहिरम, प्रवीण कटरे, रविना थिटे उपस्थित होते.


माथा ते पायथा कामाचे सादरीकरण
कोल्हापूर आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांच्या उपस्थितीत वॉटर फॉर पीपल ट्रस्टचे सामाजिक विकास अधिकारी दशरथ सोनवणे यांनी माथा ते पायथा काम समजण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले तर प्रकल्प समन्वयक तिलकचंद कटरे यांनी चित्रफितद्वारे झालेल्या व सुरू असलेल्या जलसंधारण कामाचे सादरीकरण केले.
04570

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com