केंदूरमध्ये जमीन वादातून 
बहिण, वडिलांना मारहाण

केंदूरमध्ये जमीन वादातून बहिण, वडिलांना मारहाण

Published on

शिक्रापूर, ता. १५ : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून केंदूर (ता. शिरूर) येथील सख्ख्या बहिणीसह वडिलांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात फक्कड ठकाराम साकोरे, रवींद्र फक्कड सामोरे, राजेंद्र फक्कड साकोरे, सुलोचना फक्कड साकोरे, संभाजी सुदाम साकोरे, ललिता संभाजी साकोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, केंदूर येथे छबूबाई साहेबराव आदक (वय ५२, रा.कान्हूर मेसाई, ता. शिरूर) यांच्या वडिलांची वडिलोपार्जित शेतजमीन असून सदर जमिनीचे वाटप झालेले नसल्याने छबूबाई त्याच्या बहिणींसह वडिलांकडे जमिनीच्या वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेलेल्या असताना त्यांचा भाऊ फक्कड साकोरे याच्यासह त्याच्या मुलाने छबूबाई यांचेच्याशी वाद घालत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यांनतर मंगळवारी (ता. १४) पुन्हा छबूबाई या त्यांच्या बहिणी शकुंतला ननवरे, अंजनाबाई तांबे, त्यांचा भाऊ पांडुरंग साकोरे, मुलगा स्वप्नील आदक हे वडिलांच्या घरी केंदूर येथे गेल्या व त्यांनीभाऊ फक्कड याला बोलावून घेत. आम्हाला त्या दिवशी शिवीगाळ का केली? अशी विचारणा केली. यावर फक्कड साकोरे, रवींद्र साकोरे, राजेंद्र साकोरे, सुलोचना साकोरे, संभाजी साकोरे, ललिता साकोरे यांनी पुन्हा एकदा सर्वांना शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण करत जखमी केले. याबाबत छबूबाई यांनी फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com