

शिक्रापूर, ता.२४ : ग्राहकांना ऑनलाइन सेवेची सवय लागावी म्हणून महावितरणच्या शिक्रापूर उपविभागाने अनोखा फंडा वापरला आहे. त्यांनी चक्क नियमित व वेळेवर ऑनलाइन वीजबील भरणाऱ्या ग्राहकांना चक्क मोबाईल भेट देण्याला सुरुवात केली आहे. यावेळी तीन ग्राहकांना मोबाईल तर दोन ग्राहकांना डिजिटल घड्याळे देण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाने नियमित व वेळेवर ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ ऑफर काढून त्यातून लकी ग्राहकांचे नंबर काढले गेले. शिक्रापूर उपविभागातील ढोकसांगवी येथील चंद्रकांत मलगुंडे, वसुंधरा पाचंगे तर सणसवाडी येथील विजय हरगुडे यांना मोबाईल भेट देण्यात आले तर शिक्रापूर येथील मोगल यादव व रांजणगाव गणपती येथील मनीषा बवने यांना डिजिटल घड्याळ बक्षीस देण्यात आले. सर्व भाग्यवान ग्राहकांना विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन व उपस्थित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोबाईल व डिजिटल घड्याळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना आम्हाला वेळेवर आणि ऑनलाइन वीजबिल भरल्यामुळे भाग्यवान असल्याचा आनंद महावितरणने आमच्या वाट्याला दिल्याची प्रतिक्रिया ढोकसांगवी येथील वसुंधरा पाचंगे यांनी दिली.
04657
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.