कुऱ्हाडबंदीमुळे केंदुरकरांची विद्युतदाहिनीची मागणी

कुऱ्हाडबंदीमुळे केंदुरकरांची विद्युतदाहिनीची मागणी

Published on

शिक्रापूर, ता. १० : चार हजार हेक्टर गावशिवारात जलस्त्रोत बळकटीकरणाचे काम केले जात असल्याने गावात कुऱ्हाडबंदी करण्यात आली आहे. गावात मृत्यूदरही वाढता असल्याने दहनविधीसाठी लाकडाची समस्या उभी राहिली आहे. यासाठी आता तातडीने विद्युतदाहिनी बसविण्याची गरज असल्याची गळ ग्रामसभेत केंदूर ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना घातली.
विद्युतदाहिनीच्या मागणीचे लेखी पत्र पाटील यांना देण्यात येणार आहे. तत्काळ मागणी मंजूर करण्याची विनंतीही ग्रामसभेने केल्याची माहिती सरपंच प्रमोद पऱ्हाड यांनी दिली.
केंदूर येथे चार वर्षे पाणीदार प्रकल्पांतर्गत गावातील सर्व ओढे-नाले यांचे खोलीकरण पूर्ण करत आणले असून सर्व डोंगरदऱ्यांमध्ये सीसीटीव्ही व डीपसीसीटीची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. गाव जलस्वयंपूर्ण करण्यासाठी व पर्जन्यमान नियमित ठेवण्यासाठी गावाने तीन वर्षांपूर्वी कुऱ्हाडबंदीचा निर्णय घेतल्याने अंत्यविधीसाठी दहनप्रक्रीयेला दुसऱ्या गावांतून लाकडे-सरपण आणावे लागत आहे. याच अनुषंगाने गावातील बाभळ आणि निलगिरी सरपणासाठी तोडण्याची परवानगी देण्याची मागणी गावातील अनेकांसह दशरथ सुक्रे यांनी केली. मागणी रास्त असली तरी कुऱ्हाडबंदी कायम ठेवून काय करता येईल याच अनुषंगाने पऱ्हाड यांनी याबाबत गजानन पाटील यांनाच पत्र देवून खास बाब म्हणून तत्काळ गावात विद्युतदाहिनी बसविण्याची मागणी केली असता संपूर्ण ग्रामसभेने या मागणीला एकमुखी पाठिंबा दिला. ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी सुनील दरेकर यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच मंगेश भालेकर यांच्यासह गावातील अनेक माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com