शिक्रापुरात बसच्या धडकेत
दुचाकीवरील तिघांचा मृत्यू

शिक्रापुरात बसच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू

Published on

शिक्रापूर, ता. १० : येथे पीएमपीएमएल बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवकांचा व एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. प्रथमेश नंदकुमार शेलार (वय १८), हर्षल दिगंबर घुमे (वय १९, दोघेही रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) व आयुष अतुल जाधव (वय १६, रा. कामशेत, ता. मावळ) यांचा या अपघातात मृत्यू झाला.
याबाबत शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांनी माहिती दिली की, शुक्रवारी (ता. ९) रात्री नऊच्या सुमारास शिक्रापूर येथे तळेगाव ढमढेरे रस्त्याने प्रथमेश, हर्षल व आयुष हे तिघे मित्र दुचाकीवरून (क्र. एम.एच. १२ एक्स.जी. ४७९६) शिक्रापूरकडे चालले होते. त्यावेळी त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयाजवळ समोरील वाहनाच्या पुढे जाताना त्यांची दुचाकी समोरून तळेगाव ढमढेरे बाजूने आलेल्या पीएमपीएमएल बसला (क्र. एम.एच. १२ एक्स.एम. ८८२१) धडकली. या भीषण अपघातात तिघेही गंभीर झाले. आयुष याला येथील ग्रामिण रुग्णालयात, तर उर्वरित दोघांना खासगी रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र, तिघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
07478, 07479, 07480

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com