वाजेवाडीत पूल गेला वाहून
शिक्रापूर, ता.२७ : कोरेगाव भीमा-वढू-चौफुला रस्त्याच्या दरम्यान असलेल्या ओढ्यावर बांधण्यात येत असलेला पूल वाहून गेला. पर्यायाने आधीच अर्धवट व सुमार दर्जामुळे त्रस्त असलेल्या या भागातील आठ ते दहा गावांपुढे आता वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा ते पुणे-अहिल्यानगर महामार्गावर जाण्यासाठीची नवीन समस्या उभी राहिली.
केंदूर-चौफुला-वढू बुद्रुक-कोरेगाव भीमा या रस्त्यावर असलेल्या वाजेवाडी (ता.शिरूर) परिसरात सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. याच परिस्थितीत या रस्त्यावरील वढू बुद्रुकपासून चौफुलाचे दिशेने साधारण तीन किलोमीटरवर असलेल्या ओढ्यावर सुरू असलेल्या पुलाच्या भरावाचे संपूर्ण मटेरियलचा वाहून गेले. पर्यायाने हा रस्ताच या भागातील आठ ते दहा गावांसाठी बंद झाला आहे. कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, आपटी, वाजेवाडी, चौफुला, पिंपळे-जगताप, करंदी, केंदूर, पाबळ तसेच बहुळ व जातेगाव खुर्द आदी गावांतील मोठी वाहतूक या रस्त्याने होते. या सर्व गावांसाठी आता हा रस्ता पूर्ण बंद झाला असून या सर्वांना थेट शिक्रापूर वा पिंपळे-जगताप गावातून ये-जा करावी लागणार आहे.
दोनच दिवसांपूर्वी संथगतीने काम सुरू असलेल्या या रस्त्यावर एक झाड एका दुचाकीवर पडून मोठे नुकसान झाले होते. त्याच रस्त्यावर हा प्रकार घडल्याने कंत्राटदाराच्या विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे. दरम्यान सलग तीन चार दिवसांच्या पावसाने या रस्त्यावरील अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यात, घरात पाणी शिरले. ओढ्यावरील पूल वाहून जात असताना पुलाच्या खाली पाणी जाण्यासाठी पाच मोठ्या नळ्या होत्या त्यातून पाणी वाहून जात होते तेही यात वाहून गेले.
04750
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

