

शिक्रापूर, ता. ३१ : एका अल्पवयीन युवतीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांकडे दाखल झाली आहे. याबाबत उपलब्ध माहितीनुसार पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या युवकासह त्याला मदत करणाऱ्या युवकालाही तत्काळ अटक केली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, अल्पवयीन युवतीचे दहा दिवसांपूर्वी अपहरण झाल्याची तक्रार युवतीच्या आई वडिलांना शिक्रापूर पोलिसांत दिली. यावर पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरू केला असता सदर युवती परभणी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी परभणी येथे जाऊन युवतीसह इतर दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, बाधित युवतीकडे तपास केला असता मुंजाजी ऊर्फ राम याच्यासह ज्ञानेश्वर या दोघांनी पीडित मुलीच्या घरी येऊन मुंजाजी हा पीडिताशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पिडिता या दोघांसोबत परभणी येथे गेले. तिथे गेल्यावर मुंजाजी याने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याचेही तिने सांगितले. दरम्यान, सदर तिघेही पोलिसांच्या ताब्यात येताच पीडिताच्या जबाबानुसार मुंजाजी उर्फ राम कामाजी कदम (वय २१, रा. पेठ पिंपळगाव, ता. पालम, जि. परभणी) व ज्ञानेश्वर छत्रपती कदम (वय २३, रा. सुन्ना, ता. पूर्णा, जि. परभणी) या दोघांना अटक केली. दोघांवरही अपहरणासह बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.