अपत्य झाल्यावर बालविवाह झाल्याचे उघड

अपत्य झाल्यावर बालविवाह झाल्याचे उघड

Published on

शिक्रापूर, ता.२५ : अल्पवयीन मुलीच्या वयाच्या १६ वर्षीच विवाह लावून तो दोन्ही बाजूंच्या कुटुंबाने लपविला. पण याच मुलीला अपत्य होताना हा प्रकार रुग्णालयाच्या निदर्शनास आला. त्यामुळे रुग्णालयाने पोलिसांकडे धाव घेतली आणि सासर-माहेरच्या अशा दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी अत्यंत कठोर भूमिका घेऊन गुन्हे दाखल केले असून, अल्पवयीन लग्नाचे बाबतीत कुणीही असा प्रकार करू नये म्हणून लग्नानंतर तब्बल दीड वर्षे उलटले तरीही आम्ही गुन्हा दाखल केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी... जातेगाव बुद्रूक (ता.शिरूर) येथील डहाळे परिवाराने त्यांच्या आनंदा नामक मुलाचा विवाह एका अल्पवयीन युवतीच्या आई-वडिलांच्या मदतीने डिसेंबर २०२३ मध्ये केला. यावेळी विवाहिता १६ वर्षांची होती. तिने नुकत्याच एका बाळाला पुण्यातील ससून रुग्णालयात जन्म दिला. याच वेळी ती अल्पवयीन असल्याचे रुग्णालयाच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती शिक्रापूर पोलिसांना कळविली. दरम्यान, शिक्रापूर पोलिस स्वत: फिर्यादी होत राणी पंढरीनाथ भागवत (पोलिस हवालदार, रा.शिक्रापूर, ता.शिरूर,) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अल्पवयीन युवतीचा पती आनंदा प्रकाश डहाळे, सासू भाग्यश्री प्रकाश डहाळे, सासरे प्रकाश डहाळे (तिघेही रा.जातेगाव बुद्रुक, ता.शिरुर, जि.पुणे) तसेच आई सूजल गजानन खर्डे, वडील गजानन भीमराव खर्डे (दोघेही रा.डोंगरगाव, ता.लोहा, जि.नांदेड) यांच्या विरुद्ध बालविवाह विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com