एक लाख ८० हजारांची जातेगावमध्ये वीजचोरी

एक लाख ८० हजारांची जातेगावमध्ये वीजचोरी

Published on

शिक्रापूर, ता. १५ : एका हॉटेलसह खासगी व्यक्तीची तब्बल वर्षभर सुरू असलेली वीजचोरी महावितरणच्या वीजचोरी विभागाच्या भरारी पथकाने पकडली. दोघांनीही प्रत्येकी ९० हजारांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अंकुश उमाप, संतोष वाडेकर व धनंजय तोडकर या तिघांवरही शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जातेगाव बुद्रुक व चौफुला (ता.शिरूर) येथील परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती विद्युत वितरण विभागाच्या भरारी पथकाला समजल्यावरुन त्यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक छापे टाकले. यात जातेगाव बुद्रुक येथे अंकुश उमाप यांनी विजेच्या तारेवरून वीजचोरी करत एका वर्षात तब्बल ४५४३ युनीट एवढी सुमारे नव्वद हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाली. या शिवाय चौफुला येथील हॉटेल बासरी येथे छापा टाकला असता हॉटेल चालकांनी विजेच्या तारेवरून वीजचोरी करत दहा महिन्यात तब्बल ३३२५ युनिट एवढी नव्वद हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. विद्युत वितरण विभागाच्या भरारी पथकाने या दोन्ही वीज चोऱ्यांचा पंचनामा केला असून विद्युत वितरण विभागाच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद नामदेवराव दुधाळे (वय ५४, रा.कल्याण, मुंबई) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अंकुश मारुती उमाप (रा.जातेगाव बुद्रुक, ता.शिरूर, जि.पुणे), हॉटेल बासरी गार्डनचे संचालक संतोष बाळासाहेब वाडेकर व धनंजय तुकाराम तोडकर (दोघेही रा.पिंपळे जगताप, ता.शिरूर ) यांच्या विरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार संदीप बनकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com