वारे गुरुजींना शिक्षणमंत्र्यांकडून ‘बदलीरद्द’चे बक्षीस
शिक्रापूर, ता.११ : राज्यभर जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक बदलीप्रकरणी काहीही धोरण असले तरी ज्या पद्धतीने जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा जगाच्या नकाशावर दत्तात्रेय वारे गुरुजींनी नेली. त्यामुळे विशेष बाब म्हणून त्यांना ग्रामस्थांच्या मागणीनुसार ‘बदलीमुक्त’ करून त्यांना जालिंदरनगरमध्येच आहे तिथे आम्ही रुजू ठेवत आहोत. त्यांना राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांच्या उन्नतीसाठीच्या अतिरिक्त कामाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जालिंदरनगर (ता.खेड) येथे केली.
टी फॉर एज्युकेशन संस्थेच्या जागतिक आदर्श शाळा प्रकल्पांतर्गत एक कोटीचे बक्षीस मिळविलेल्या जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेसह शिक्रापूर (ता.शिरूर) येथील वाबळेवाडी शाळेला खास भेट देण्यासाठी शनिवारी (ता.१०) भुसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व इतर प्रमुख अधिकाऱ्यांनी दौरा केला. यात सकाळी नऊच्या सुमारास वाबळेवाडी येथील भेटीचे दरम्यान वारे यांच्या कल्पनेने वाबळेवाडी ग्रामस्थांनी उभ्या केलेल्या संपूर्ण शाळा परिसराची पाहणी केली. सर्व विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यात लोकवर्गणीतून एखादी शाळा कशी उभी राहते. याबाबतच्या ग्रामस्थांशी त्यांनी खुलासेवार चर्चा केली.
पुढील दौऱ्यात त्यांनी जालिंदरनगर येथे भेट देऊन येथे दत्तात्रेय वारे यांनी विकसित केलेल्या सर्व शाळा उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा संपूर्ण कार्यक्रम राज्यभरातील सर्व जिल्हा परिषद शाळांसाठी लाइव्ह बंधनकारक करून जालिंदरनगरसारख्या शाळा राज्यभर उभारण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. दरम्यान कोकण, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव व पुणे जिल्ह्यातून सरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांनाही जालिंदरनगर येथे निमंत्रित केले होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आमदार बाबाजी काळे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राहुल रेखावर, सहसंचालक हरुन अत्तार, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, संजय नाईकडे, उपसंचालक गणपत मोरे, संजय नाईकडे, सतीश वाबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, रामभाऊ सासवडे, सरपंच सुनिता चौधरी, सुदाम माशेरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेंद्र गायकवाड यांनी केले.
दरम्यान, शाळेतील लोकवर्गणीतील अपहाराच्या आरोपांनंतर दत्तात्रेय वारे गुरुजींनी चप्पल घालणे बंद केले होते. मात्र, दादा भुसे यांनी भर कार्यक्रमात वारे गुरुजींना ज्यांनी शिकविले त्या झेंडे गुरुजींच्या हस्ते आणि वारे गुरुजींचे वडील निवृत्त शिक्षक बबनराव वारे गुरुजींच्या उपस्थितीत चप्पल घालण्याची विनंती केली.
पूर्वी शासनाच्या तब्बल १५ विविध समित्यांना अनुसारुन विविध शाळाबाह्य कामे राज्यभरातील शिक्षकांवर लादली होती. ती आम्ही कमी करतोय. आता केवळ आवश्यक अशा ४च समित्यांची कामे शिक्षकांसाठी दिली जाणार आहेत.शिक्षकांचा कमाल वेळ अध्यापनात जाईल यासाठी ही तरतूद करीत आहे.
- दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
.
शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा ४थी-७वीला सुरू
पाच वर्षांपूर्वी पूर्वीच्या इयत्ता चौथी व सातवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा बंद करुण त्या इयत्ता पाचवी-आठवीला सुरू केल्या होत्या. मात्र यावर्षीपासून दोन्ही पद्धतीने परीक्षा होऊन पुढील वर्षीपासून पुन्हा पूर्वीसारख्या चौथी-सातवीसाठी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करीत असल्याची घोषणाही यावेळी दादा भुसे यांनी जाहीर केली.
05023
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.