दहशतीत असलेल्या शिक्रापूरकरांचा जीव पडला भांड्यात!
शिक्रापूर, ता. ४ : पिंपरखेडमधील बिबट्या हल्ल्याने ऊसक्षेत्र असलेला संपूर्ण शिरूर तालुका बिबट्याच्या दहशतीत आहे. अशातच मंगळवारी (ता.४) शिक्रापुरातील वाबळेवाडीत ऊसतोड सुरू होती. त्यावेळी बिबट्याच्या पिल्ले ऊस फडात असल्याचे कळताच संपूर्ण शिक्रापूरकर वाबळेवाडीत धावले. तेथे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी पोचले. तेव्हा ही पिले रानमांजरीची असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
वाबळेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या संख्येने वाढलेला आहे. याभागात ऊस क्षेत्र असल्याने शिक्रापूरच्या पंचक्रोशीत तब्बल १८ ते २० बिबटे वावरत असल्याची माहिती स्थानिक देतात. वाबळेवाडीतील देविदास वाबळे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना, दोन बिबट्यासदृश प्राण्यांची पिल्ले ऊस फडात आढळून आली. हे पाहताच ऊस तोड कामगार आणि वाबळे यांचे कुटुंबीयही धास्तावले आणि वाबळेवाडीत एकच खळबळ उडाली. ही वार्ता शिक्रापूरात क्षणार्धात पसरली आणि नागरिकांनी वाबळेवाडीत मोठी गर्दी केली. दरम्यान, याबाबतची माहिती वाबळेवाडीतील काही युवकांनी वनखात्यासह निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग वन्यजीव बचाव पथकाचे प्रतिनिधी शेरखान शेख, वैभव निकाळजे, राहुल कुसाळकर यांना कळविली आणि हे सर्वजण तत्काळ संबंधित ऊस फडाकडे धावले व त्यांनी पाहणी केली असता. सदर पिल्ले ही रानमांजराची असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तोपर्यंत बिबट्या मादी कधीही आपल्या पिल्लांपर्यंत येवू शकते, या शंकेने संपूर्ण वाबळेवाडीकरांची पाचावर धारण बसल्याचे चित्र होते.
दरम्यान, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ग्रामपंचायत सदस्या विद्या घाडगे, देविदास वाबळे, भारती वाबळे यांनी यावेळी मोठ्या धिराने स्थानिकांना धीर दिल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिले. दोन्हीही पिल्लांची माहिती प्राणीमित्रांनी शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील यांना दिली व दोन्ही पिलांना तिच्या आईशी पुनर्मिभेटीसाठी तिथेच ठेवून देण्यात आली.
05060
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

