पवार यांना श्रद्धांजली अन्‌ ऊसगाळप बंद

पवार यांना श्रद्धांजली अन्‌ ऊसगाळप बंद

Published on

शिक्रापूर, ता.२९ : साखर उद्योगाचे अभ्यासू नेतृत्व तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स कारखाना पूर्ण बंद ठेवण्यात आला. व्यवस्थापन, अधिकारी-कर्मचारी यांच्या एकत्रित निर्णयाने आजच्या दिवसाचे संपूर्ण गाळपही बंद ठेवण्यात आले.
अजित पवार यांच्या निधनामुळे गुरुवारी (ता. २९) शिक्रापूर परिसरातील बहुतांश उद्योग व कारखानांनी बंद पाळला. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर गेले दोन दिवस वाहतूकही तुरळक राहिली. महामार्गावरील व्यावसायिकांनी आपापले उद्योग-व्यवसायही बंद ठेवले. याच पार्श्वभूमीवर व्यंकटेशकृपा शुगर मिल्स कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापन, अधिकारी-कर्मचारी यांच्या बैठकीत झाला. त्यानुसार आजच्या दिवसाचे ऊस गाळपही पूर्ण बंद ठेवण्यात आले. व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लिमिटेड परिवार या दुःखदप्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. अजित पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी सामूहिक प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.


साखर कारखानदारी म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार अन्‌ साखर कारखानदारी जगवून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाही सक्रिय ठेवण्याचा एक ताळेबंद असतो. तो समजणारा राज्यातील प्रभावी आणि सर्वांना समजून घेणारा नेता म्हणून अजितदादांची प्रतिमा सर्वांच्या मनी आहे. त्यांच्या निधनाने केवळ ऊस उत्पादक शेतकरीच नाही तर राज्यातील संपूर्ण साखर कारखानदारी क्षेत्र पोरके झाले आहे.
- संदीप तौर, अध्यक्ष, व्यंकटेशकृपा शुगर मिल्स, जातेगाव बुद्रुक, (ता.शिरूर)

05189

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com