शिक्रापूर येथील युवकाला मारहाण

शिक्रापूर येथील युवकाला मारहाण

Published on

शिक्रापूर, ता. १९ : ‘रागाने का बघतो,’ असे म्हणत येथील अमर भुजबळ या युवकाला शिवीगाळ, दमदाटी केली व त्याच्या चारचाकीचे मोठे नुकसान कोंढापुरी (ता.शिरूर) येथील युवकांनी केले.
संघर्ष गायकवाड असे आरोपी युवकाचे नाव असून, आरोपींमध्ये आणखी दोन अनोळखी युवक असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, येथील अमर भुजबळ (वय २८, रा.तळेगाव रोड, शिक्रापूर, ता.शिरूर) हा मंगळवारी (ता.१७) येथील पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील महादेव मंदिरात देवदर्शनासाठी गेलेला होता. तो मंदिरातून बाहेर येताच तो शेजारील एका हॉटेलात चहा पिण्यासाठी थांबला. यावेळी सिगारेट ओढत उभ्या असलेल्या तिघा युवकांनी अमरला आमच्याकडे रागाने का बघतो? असे म्हणत थेटपणे शिवीगाळ व दमदाटी करून दगडाने बेदम मारहाण केली. याबाबत पोलिस ठाण्याकडे तक्रार देण्यासाठी निघाला असताना युवकांनी त्याचा दुचाकीवरून पाठलाग केला आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यासमोर अडवून त्याच्या मोटारीची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात संघर्ष गायकवाड (रा.कोंढापुरी, ता.शिरूर, जि.पुणे) याच्यासह दोन अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com